________________
गुरु-शिष्य
१३१
जिथे पैशांचा व्यापार आहे, तिथे त्यांना गुरू म्हणता येणार नाही. जिथे तिकीट आहे, ती तर सगळी रामलीलाच म्हटली जाते. परंतु लोकांना आता भान राहिले नाही, म्हणून बिचारे तिकीटवाल्याकडेच शिरतात. कारण तिथे सर्व खोटे आहे आणि हा स्वतःही खोटा आहे, म्हणून दोघांचा मेळ बसतो! अर्थात साफ खोटे व साफ घोटाळाच, चालला आहे, एकदम.
मग म्हणतील की, 'मी निःस्पृह आहे.' अरे, असे गात का राहतोस? तू निःस्पृह आहेस, तर तुझ्यावर कोणी शंका घेणार नाही आणि तू स्पृहावाला असशील तर तू कितीही सांगितलेस तरी तुझ्यावर शंका घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण तुझी स्पृहाच सांगेल, तुझी वृत्तीच सांगेल की तू कसा आहेस.
त्यात त्रूटी कुठे? हे तर सगळे भिकेसाठी बाहेर पडले आहेत. स्वतःचे पोट भरण्यासाठी फिरत आहेत, सगळे आपापले पोट भरण्यासाठी निघाले आहेत, किंवा मग पोट भरायचे नसेल तर कीर्ति हवी आहे. कीर्तीची भीक (लालसा), लक्ष्मीची भीक, मानाची भीक! बिनभिकेचा मनुष्य असेल तर त्याच्याकडे जे मागाल ते प्राप्त होईल. भीकवाल्याकडे आपण गेलो तर तो स्वत:ही सुधारलेला नाही आणि आपल्यालाही सुधारणार नाही. कारण लोकांनी दुकाने सुरु केलीत आणि त्यांना ग्राहकही मिळतात, निवांतपणे!
एका व्यक्तीने मला विचारले की, यात दुकानदारांचा दोष आहे की ग्राहकांचा दोष? मी म्हणालो, 'ग्राहकांचा दोष!' दुकानदार तर कुठलेही दुकान घालून बसेल, परंतु आपल्याला समजायला नको? थोडीशी कणीक काट्याला लावून तो काटा तलावात टाकतो, त्यात मासेमायचा दोष की खाणाऱ्याचा दोष? ज्याला लालूच आहे त्याचा दोष की मासेमाऱ्याचा दोष? जो पकडला जातो त्याचा दोष! हे आपले लोक फसलेच आहेत ना, या सगळ्या गुरूंकडे.
लोकांना स्वत:ला पुजून घ्यायचे आहे म्हणून संप्रदाय बनवले गेले.