________________
गुरु-शिष्य
१२१
यात एक-दोन पुरुष चांगले असतात पण मग त्यांच्या नंतर गादीपती वगैरे सर्व सुरु होऊन जाते, सगळीकडेच गादीपती ना? गादीपती हे कधी शोभत नाहीत. धर्मात गादी नसते. दुसऱ्या सर्व जागी, सर्व कलांमध्ये, व्यापारात गादी असते. परंतु धर्मात गादी नसते. धर्मात तर ज्याच्याकडे आत्म्याचे (ज्ञान) असेल, असा आत्मज्ञानी असावा!
प्रश्नकर्ता : पूर्वी गादया नव्हत्या, तर या गादीपतीची सुरवात कशी झाली?
दादाश्री : ते तर या अक्कलवाल्यांच्या हातात गेले ना, म्हणून त्या अक्कलवाल्यांनी शोधून काढले. दुसरे कोणी राहिले नाही, म्हणून त्यांनी दुकाने मांडली. बाकी आंधळ्याला मूर्ख येऊन मिळतात. या देशात माहीत नाही कुठून येऊन मिळतात. असाच्या असाच गोंधळ माजवला आहे या लोकांनी, आणि आरामात गादीपती होऊन बसतात!
गादीपती होण्याचा अधिकार कोणाला आहे ? तर ज्यांच्यात क्रोधमान-माया-लोभ नसेल त्यांना! तुम्हाला हे न्यायपूर्ण नाही का वाटत? न्यायाने कसे असेल पाहिजे.
प्रश्नकर्ता : बरोबर आहे.
दादाश्री : म्हणून काही लोक आम्हाला विचारतात की हे तुम्ही 'अक्रम' का काढले? मी सांगितले, हे मी काढले नाही, मी तर निमित्त बनलो आहे. मी कशासाठी काढू? मला काही येथे गादया स्थापन करायचा आहेत? आम्ही काय येथे गादया स्थापन करण्यास आलो आहोत? आम्ही काय कोणाचे उत्थान करतो? नाही. येथे तर कोणाचे मंडनही करत नाही आणि कुणाचे खंडनही करत नाही, येथे असे काहीच नसते. येथे गादीच नाही ना! गादी असेल त्यांनाच ही झंझट असते. जिथे गाया आहेत, तिथे मोक्ष नसतोच. असूच शकत नाही.
पुजण्याची कामनाच कामाची धर्मवाल्यांनी तर स्वतःचा मतार्थ ठेवण्यासाठी, स्वत:ला पुजले जाण्याची दुकाने चालविण्यासाठी हे सगळे मार्ग शोधून काढले आहेत.