________________
१२०
गुरु-शिष्य
प्रोबेशनर काय कामाचे? आणि ज्यांच्यातून 'हुंकार' (मी काही तरी आहे) निघून गेला असेल ना, त्यानंतर तोच देव! जर कधी अधिक दर्शन करण्यायोग्य पद असेल तर ते फक्त एकच की ज्यांचा 'हुंकार' समाप्त झाला असेल, पोतापणुं (मी आहे, आणि माझे आहे असे आरोपण, माझेपणा) गेला असेल. जिथे 'पोतापर्यु' गेला तिथे सर्वस्व निघून गेले!
हे जे 'गुरूब्रम्हा, गुरूविष्णु, गुरू महेश्वरा' म्हणतात ते तर गुरूच नसतात. हे तर 'गुरूब्रम्हा गुरूविष्णुः...' या नामामुळे स्वतःचा फायदा करुन घेतात. त्यामुळे मग लोक त्यांची पूजा करतात ! परंतु वास्तविकपणे ही तर सद्गुरूंची गोष्ट आहे. सद्गुरू अर्थात ज्ञानी पुरुषांची ही गोष्ट आहे. जे सत्ला जाणतात, सत्चे जाणकार आहेत, त्या गुरूंसाठी ही गोष्ट आहे. परंतु येथे तर या सर्व अपात्र गुरूंनी हे स्वतःसाठी समजून घेतले आहे.
___ बाकी जे गुरू होऊन बसलेत, त्यांना सरळ सांगून टाकावे की, 'साहेब, मला गुरू करायचे नाहीत. व्यापारी गुरू बनवण्यासाठी मी आलो नाही. मी तर ज्याला गुरू व्हायचे नाही, त्यांना माझे गुरू करण्यासाठी आलो आहे.
गुरूचा पुत्र गुरू? प्रश्नकर्ता : पूर्वीच्या काळी जी गुरू परंपरा होती की गुरू शिष्याला शिकवत असत, नंतर शिष्य गुरू बनून स्वत:च्या शिष्याला शिकवीत असत...
दादाश्री : ती परंपरा खरी होती. परंतु आता तर ती परंपरा राहिलीच नाही ना! आता तर गादीपती (उत्तराधिकारी) होऊन बसलेत. गुरूचा पुत्र गुरू बनेल, असे कसे मानले जाईल? गादींची (उत्तराधिकारी नेमण्याची) स्थापना केली, याचा दुरुपयोग झाला.
प्रश्नकर्ता : धर्म व्यवस्थेच्या जागी समाज व्यवस्था झाली.
दादाश्री : हो. समाज व्यवस्था झाली!! धर्म तर कुठेच राहिला, धर्म तर धर्माच्या स्थानावर राहिला! शिवाय कलियुगानेही घेरले आहे!