________________
११८
गुरु-शिष्य
नगुरो कोणी म्हटलेले? हे जे कंठीवाले गुरू आहेत ना, त्यांनी नगुरो उभा केला आहे. त्यांचे ग्राहक कमी होणार नाहीत म्हणून. कंठी बांधली नसेल त्यास हरकत नाही. ही कंठी तर, एक प्रकारचा मनात सायकॉलॉजिकल इफेक्ट (मानसिक परिणाम) ठसवतात. हे सगळे संप्रदायिक मतवाले काय करतात? लोकांना कंठ्याच बांधत राहतात. मग त्याच्यावर परिणाम होतो की, 'मी या संप्रदायाचा! मी या संप्रदायाचा!' म्हणजे सायकॉलॉजिकल इफेक्ट होतो. परंतु ते चांगले आहे. ते काय चुकीचे नाही. ते आपल्याला नुकसानकारक नाही. तुम्हाला 'नगुरो' ची काळजी करायची नाही, 'नगुरो' म्हटले तर तुमची अब्रू जाईल, असे वाटते का तुम्हाला?
प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : मग 'नगुरो' ची चिंता तुम्ही का करता? प्रश्नकर्ता : त्या कंठीची गोष्ट आली ना, म्हणून.
दादाश्री : हो. पण कंठी घालणाऱ्यांना असे सांगावे की, 'ही घातलेली कंठी मी कुठपर्यंत ठेवीन? मला फायदा होत असेल तोपर्यंत ठेवीन. नाही तर मग तोडून टाकीन' अशी त्यांना अट घातली पाहिजे. त्यांनी विचारले की ' तुम्हाला कोणता फायदा हवा आहे?' तेव्हा आपण सांगावे 'माझ्या घरात कटकट होता कामा नये. नाही तर मी कंठी तोडून टाकीन.' आधीच असे सांगायला हवे. लोक असे सांगत नसतील ना? येथे तर कटकटही चालू असते आणि कंठी सुद्धा चालू असते. कंठी बांधून सुद्धा क्लेश होत असेल तर आपण ती कंठी तोडून टाकावी. गुरूला सांगावे की, 'ही घ्या, तुमची कंठी परत. तुमच्या कंठीत काहीच गुण नाही. ही कंठी तुम्ही मंत्रून दिलेली नाही. अशी मंत्रून द्या की माझ्या घरात भांडणे होणार नाहीत.
प्रश्नकर्ता : कंठी बांधली नसेल तोपर्यंत उपदेश ऐकला तरी पण ज्ञान (डोक्यात) उतरत नाही, असे ते सांगतात.
दादाश्री : घ्या! कंठी बांधली नाही तर तुम्हाला ज्ञान होणार नाही (!) किती धमकावतात! ओरडून, ओरडून या सगळ्यांना सरळ करतात!!!