________________
११६
गुरु-शिष्य
प्रश्नकर्ता : बरोबर आहे, पण अपवादस्वरूप एखादा तरी खरा गुरू असेलच ना?
दादाश्री : कोणी चांगले गुरू असतील तर तो डब्बा असेल. डब्बा म्हणजे त्याला काही सुद्धा समजत नसेल. मग त्या समज नसलेल्या गुरूचे काय करणार? ज्यांना समज असते ते मग दुरुपयोग करतात. त्यापेक्षा तर घरी पुस्तके असतील, ती धरुन त्यांचे मनन करत राहणे चांगले. म्हणजे आता जसे आहेत तसे गुरू चालणार नाहीत. त्यापेक्षा गुरू न केलेलेच बरे. गुरूशिवाय तसेच राहणे चांगले.
__ प्रश्नकर्ता : आमच्या संस्कृतीप्रमाणे बिनगुरूचा मनुष्य नगुणो म्हटला जातो.
दादाश्री : हे तुम्ही कुठे ऐकले? प्रश्नकर्ता : संत पुरुषांकडून ऐकले होते.
दादाश्री : हो, पण ते काय म्हणतात? नगुणो नाही, पण नगुरो. गुरू नसलेला किंवा नगुरो म्हणतात. नगुरो म्हणजे गुरू नसलेला! ज्याला कोणी गुरू नसेल त्यांना आपले लोक नुगरो म्हणतात.
बारा वर्षाचा असताना आमची कंठी तुटली होती, तेव्हा लोक मला 'नगुरो, नगरो' असे म्हणायचे. सगळेच म्हणायचे, 'कंठी तर घातलीच पाहिजे. आपण पुन्हा कंठी घालू.' मी म्हटले या लोकांकडून काय कंठी बांघून घ्यायची असते? ज्यांचा प्रकाश नाही, ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रकाश देण्याची शक्तीच नाही, त्यांच्याकडून कंठी कशी बांधून घेणार? तर म्हणतात, 'लोक नगुरो म्हणतील' आता नगुरो म्हणजे काय असेल? नगुरो म्हणजे कुठली तरी शिवीगाळ असेल, असे मला वाटलेले. ते मग मी मोठा झाल्यावर, मला कळले की नगुरो म्हणजे नगुरू-गुरू नसलेला!
प्रश्नकर्ता : जर कुणाला गुरू मानायचे असेल, तर त्यासाठी विधी असतात, कंठी घालतात, कपडे बदलवतात, अशी काही गरज असते का?
दादाश्री : अशी कोणतीच गरज नसते.