________________
गुरु-शिष्य
११५
कळते की रुपयाला खणखणवले तर तो दावा मांडत नाही आणि येथे तर हे दावा मांडतील. म्हणून आपण ती शाल त्यांना द्यावी. तेवढे शंभर रुपयाचे नुकसान सहन करावे लागेल. परंतु आम्ही त्या दुकानातून फसण्यापासून तर वाचलो ना! माझे काय म्हणणे आहे की कुठपर्यंत फसत राहायचे?
आणि ज्या गुरूंना राग-द्वेष होत नाहीत, ते अंतिम गुरू! त्यांना जेवण वाढल्यानंतर लगेच ताट उचलून घेतले तरी त्यांच्या डोळ्यात काही फरक दिसला नाही, डोळ्यात क्रोध दिसला नाही, तर समजावे की हे आहेत 'अंतिम' गुरू! आणि जर क्रोध दिसला तर त्या गोष्टीत काही दमच नाही ना! तुमच्या लक्षात आले का हे?
प्रश्नकर्ता : हो. हो.
दादाश्री : म्हणजे परीक्षा हेतूसाठी नाही, पण शोध ठेवला पाहिजे. फक्त परीक्षा हेतूसाठी असेल तर ते वाईट दिसेल. परंतु जरा लक्ष ठेवले पाहिजे की त्यांच्या डोळ्यात असे का होत आहे ! जेवणाचे ताट उचलले तेव्हा जर डोळ्यात बदल झाला तर लगेच म्हणा की, 'नाही, दुसरे चांदीचे ताट आणतो.' परंतु पाहून घ्यावे की 'डोळ्यात बदल होत आहे की नाही.' शोध तर घ्यायला हवा ना?
आपली फसवणूक करुन घेऊन माल आणला तर तो काय कामाचा? माल आणण्यासाठी गेलात, तर त्याने माल बघितला तर पाहिजे ना! बघायला नको का? जरा खेचून पाहावे लागते ना? नंतर फाटके निघाले तर लोक म्हणतील, 'तुम्ही शाल बघून का घेतली नाही?' असे म्हणतील की नाही? म्हणून श्रीमद् राजचंद्र म्हणतात ना, 'गुरू नीट बघून करा, पारखून करा!' नाही तर ते तुम्हाला भटकत ठेवतील. तेव्हा वाटेल त्याला गुरू करुन भागणार नाही. एकदा फसल्यानंतर काय करु शकतो! म्हणून सगळ्या बाजूंनी बघावे लागते.
उघड केल्या गोष्टी, वीतरागतेने या कलियुगात चांगले गुरू मिळणार नाहीत, आणि गुरू तुमची भाजी करून खातील.