________________
१२२
गुरु-शिष्य
म्हणजे लोकांना यातून बाहेर निघूच दिले नाही. स्वत:ला पुजून घेण्यासाठी लोकांना उलट मार्गावर चढवले. असे तोडफोड करणारे लोक दुसरे काही होऊच देत नाहीत. तोडफोड करणारे म्हणजे पुजून घेण्याची कामना ठेवणारे. पुजले जाण्याची कामना ही दलालीच आहे ना!
धर्माचे पुस्तक हातात आले आणि जर कोणी त्याला तिथे बसवले की, 'आता तू हे पुस्तक वाच.' तेव्हापासूनच त्याला अशी कामना उत्पन्न होते की आता लोक माझी पूजा करतील. म्हणजे तुम्हाला जर पुजले जाण्याची कामना होत असेल, तर तुम्हाला डिसमिस केले पाहिजे. कारण ज्ञानी पुरुषाच्या पुस्तकाला स्पर्श केल्यानंतरही अशी कामना उत्पन्न का झाली? उलट अशी कामना असेल तीही नष्ट व्हायला हवी! आणि हे तर अजून कामना उत्पन्न होत आहेत. तुमच्या हे लक्षात येते की लोकांमध्ये स्वतःला पुजून घेण्याची कामना डोके वर काढत आहेत?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : परत आत स्पर्धाही चालते. लोक जर दुसऱ्या कोणाला अधिक पुजत असतील तर ते त्याला आवडत नाही. जणू पुजले जाणे हाच मोक्ष (!) आहे, असे या लोकांनी मानले आहे !! ही तर मोठी जोखीम आहे. बाकी, ज्याचे या जगात कोणाशीही भांडण होत नसेल, त्याला पुजलेले कामाचे.
या गुरूंना स्वत:ला पुजून घेण्याच्या कामना उत्पन्न होतात, गुरू होण्याची कामना असते. जेव्हा की कृपाळू देवांना कशी कामना होती ती तरी ओळख, की 'परम सत् जाणण्याचा इच्छुक आहे !' दुसरी त्यांना कोणत्याही गोष्टीची कामना नव्हती!! मला तर पुजले जाण्याची कामना आयुष्यात कधीच उत्पन्न झाली नाही. कारण ते बाँदरेशन (त्रास) म्हटले जाते. पुजण्याची कामना हवी, आपल्यापेक्षा कोणी मोठा असेल त्याला! कामना हवी.
प्रश्नकर्ता : मान, पूजा गर्वरस हे सगळे पोतापणांच्याच मैफली ना?
दादाश्री : या सगळ्या पोतापणां ('मी पणा' 'माझे पणा') मजबूत करणाऱ्या गोष्टी आहेत! पोतापणां मजबूत केला असेल तो मग कधी तरी