________________
गुरु-शिष्य
११७
प्रश्नकर्ता : धर्मगुरू असे का म्हणतात की कंठी बांधली असेल त्याला देव तारतो आणि नगुरोला कोणी तारत नाही. ही गोष्ट खरी आहे?
दादाश्री : त्याचे असे आहे की, या मेंढपाळांनी ही गोष्ट पसरवली होती. मेंढपाळ मेंढ्यांना असे सांगतात की, 'नगुरो होऊन फिरू नकोस' मग मेंढ्यांना वाटते की, 'ओहोहो! मी नगुरो नाही. चला तर कंठी बांधा! गुरू करा!' म्हणून हे गुरू केले. म्हणजे हे मेंढे आणि ते मेंढपाळ !! पण तरी आम्ही हे शब्द बोलता कामा नये. परंतु जिथे ओपन (स्पष्ट) समजायचे असेल, तिथे फक्त समजण्यासाठी सांगतो. ते सुद्धा वीतरागतेने सांगतो. आम्ही असे शब्द बोलतो, परंतु आम्हाला सुद्धा राग-द्वेष होत नाही. आम्ही ज्ञानी पुरुष आहोत, आम्ही जबाबदार म्हटले जातो. आम्हाला कोणत्याही जागी, थोडा सुद्धा राग-द्वेष नसतो.
प्रश्नकर्ता : मला दोन-तीनदा साधू- संन्यासी भेटले, ते म्हणाले की, 'तुम्ही कंठी बांधून घ्या' मी नाही म्हटले. 'मला बांधून घ्यायची नाही.'
दादाश्री : हो पण जे पक्के आहेत, ते बांधून घेत नाहीत ना! आणि जो कच्चा असेल तो तर बांधूनच घेईल ना!
प्रश्नकर्ता : गुरूकडून कंठी बांधून घ्यायची नसेल, पण आम्हाला एखाद्या गुरूप्रति पूज्यभाव निर्माण झाला असेल, आणि त्यांचे ज्ञान घेतले, तर कंठी बांधल्याशिवाय गुरू शिष्यांचा संबंध प्रस्थापित झाला असे म्हटले जाईल की नाही? काही शास्त्र व आचार्यांनी असे सांगितले आहे की नगुरो असेल त्याचे तोंड सुद्धा पाहू नये.
दादाश्री : असे आहे, की वाड्यात (संप्रदायात) घुसायचे असेल तर कंठी बांधावी आणि स्वतंत्र राहायचे असेल तर कंठी बांधून घेऊ नका. जिथे ज्ञान दिले जात असेल त्यांची कंठी बांधा.वाडा म्हणजे ते काय म्हणायचे आहे की प्रथम तू ह्या स्टँडर्डसाठी तयार हो! ह्या थर्ड स्टँडर्ड मध्ये तयार हो, तोपर्यंत आणखी कुठे व्यर्थ प्रयत्न करू नकोस, असे सांगू इच्छितात.
बाकी, नगुरो कसे म्हणायचे? नगुरो तर या काळात कोणीच नाही.