________________
११२
गुरु-शिष्य
पाच माणसे सुधारली असतील, तर मला दाखवा की ज्यांचा क्रोध-मानमाया-लोभ यांचा कमकुवतपणा निघून गेला असेल किंवा मतभेद कमी झाले असतील.
प्रश्नकर्ता : आपल्याला खरे गुरू मिळालेत की नाही ते जाणण्याची आपली शक्ती किती?
दादाश्री : पत्नीबरोबरचे मतभेद मिटले असतील, तर समजावे की त्याला गुरू मिळाले आहेत. हे तर पत्नीशी सुद्धा मतभेद होतच राहतात. रोजच भांडणे होत असतात. अर्थात जर गुरू मिळाले आणि काही विशेष फरक पडला नाही, तर काय त्याचा उपयोग? ____ हा तर क्लेश जात नाही. कमकुवतपणा जात नाही आणि म्हणतात की, 'मला गुरू मिळाले आहेत.' आपल्या घरातील क्लेश जाईल, कलह संपेल, तरच गुरू मिळाले असे म्हणता येईल. त्याशिवाय गुरू मिळाले असे कसे म्हणू शकतो? हे तर स्वतःचा पक्ष मजबूत करतात की 'आम्ही या पक्षाचे आहोत'. म्हणजे स्वतःचा पक्ष मजबूत करतात आणि (संसाराची) गाडी चालवतात. अहंकार इकडचा होता, तो त्या बाजूस वळवला. आपल्याला जरी सहाच महिने खरे गुरू मिळाले असतील तरी गुरू इतके तर नक्कीच शिकवतीलच की ज्यामुळे घरातील क्लेश संपेल. फक्त घरातूनच नाही, मनातून सुद्धा क्लेश निघून जाईल. मनात सुद्धा क्लेशित भाव नसेल आणि जर क्लेश होत असेल, तर त्या गुरूंना सोडून द्यावे. नंतर दुसरे गुरू शोधून काढावे.
बाकी, चिंता-उपाधि असेल, घरात मतभेद असतील, ही सगळी गुंतागुंत जर गेली नसेल तर ते गुरू काय कामाचे? त्या गुरूला सांगा की, 'मला अजूनही राग येतो, घरात मी मुला-मुलींवर चिडतो, तर ते तुम्ही थांबवा. नाही तर मग पुढच्या वर्षी तुम्हाला कॅन्सल (रद्द) करीन.' आपण असे सांगू शकतो की नाही? तुम्हाला काय वाटते? नाही तर या गुरूंना सुद्धा 'मिठाई' मिळत राहते आरामात, हप्ता मिळतच राहतो ना! म्हणजे हा सगळा अंधेर चालू आहे हिंदुस्तानात. फक्त आपल्या हिंदुस्तान देशातच नाही, तर सगळीकडेच असे झाले आहे.