________________
११०
गुरु-शिष्य
बी सिन्सिअर!' अरे, तू मॉरल बन ना! तू मॉरल झालास तर तुला मला सांगावे लागणार नाही. मॉरल होऊन मला सांग तर मी मॉरल होईन. तुला पाहताक्षणीच मॉरल होऊन जाईन. जसे पाहतो तसे आम्ही होऊनच जातो. परंतु तो स्वतःच झाला नाही ना!
माझ्यात वीतरागता असेल ती तुम्ही पाहाल, आणि एकदा पाहिले की मग होईल. कारण मी तुम्हाला करून दाखवत आहे म्हणून मग तुम्हालाही ते जमेल. म्हणजे मी प्योर असेल तरच लोक प्योर होऊ शकतील! अर्थात कम्पलीट प्योरिटी असली पाहिजे.
मी तुम्हाला 'मॉरल बना' असे सांगत राहत नाही, परंतु 'मॉरल कसे होता येईल' ते मी सांगतो. मी असे म्हणतच नाही की 'तुम्ही असे करा, चांगले करा किंवा असे बनून या'. मी तर 'मॉरल कसे होता येईल' ते सांगतो, रस्ता दाखवतो, तेव्हा लोकांनी काय केले? 'ही रक्कम आणि हे उत्तर' अरे, पण रीत शिकव ना! रक्कम व उत्तर तर पुस्तकात लिहिलेच आहेत पण परंतु त्याची रीत तरी शिकव!! पण रीत शिकवणारा कोणी निघालाच नाही. रीत शिकवणारा निघाला असता तर हिंदुस्तानची ही दशा झाली नसती. हिंदुस्तानची दशा तर पाहा आज! कशी दशा झाली आहे!!!
खऱ्या गुरूंचे गुण प्रश्नकर्ता : मला हे कसे समजेल की माझ्यासाठी खरे गुरू कोण आहेत?
दादाश्री : जिथे बुद्धी नसेल आणि बॉडीची ओनरशिप (देहाचा मालकीपणा) नसेल तिथे. मालकीपणा असेल तर त्यांचाही मालकीपणा व आपला सुद्धा मालकीपणा, दोघेही सामोरे ठाकतील! मग काम होणार.
मग, जे आपल्या मनाचे समाधान करतील, ते आपले गुरू. तसे गुरू मिळाले नाही तर दुसऱ्या गुरूंचा काय उपयोग?
गुरू तर आपल्याला सर्व प्रकारे मदत करतील, असे पाहिजेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपल्याला मदत करतील. पैशांच्या अडचणीत