________________
गुरु-शिष्य
१०९
माल बिघडून गेला आहे ना! शंभरात दोन-पाच असे चांगले असतील. वचनबळ म्हणजे तोंडाने जसे बोलेल तसेच समोरच्याचे होईल. आता असे वचनबळ नसेल, तर ते काय कामाचे?
मी लहान असताना असे सांगत असे की तुम्ही जो उपदेश देत आहात, तसे तर पुस्तक सुद्धा बोलते. मग तुमच्यात आणि पुस्तकात फरक काय राहिला? त्यापेक्षा तर पुस्तक चांगले. असे वाकून तुमच्या पाया पडणे, त्यापेक्षा तर पुस्तक चांगले. तुम्ही असे काही बोला की 'माझ्यावर त्याचा परिणाम होईल, माझे चित्त त्याच्यात राहील' हे तर काय म्हणतात? 'करा, करा, करा, करा!' 'हे करा' तर काय करु? माझ्याकडून होत नाही आणि तुम्ही सारखे 'हे करा, करा' असे का सांगता? यासाठी तर वचनबळ पाहिजे, वचनबळ ! ते बोलतात तसे समोरच्यात होते, तरच ते गुरू म्हटले जातील. नाही तर त्यांना गुरू म्हणता येणारच नाही. ज्ञानी पुरुष तर मोक्ष देतात. पण गुरू केव्हा म्हणायचे? वचनबळ असेल तर. कारण त्यांच्या वचनामध्ये खोटेपणा-कपट वगैरे नसते. त्यांच्या वचनात वचनबळ असते. तुमच्या लक्षात येत आहे ना की मी काय म्हणत आहे ते?
प्रश्नकर्ता : हो, हो.
दादाश्री : खूप गहन गोष्ट आहे. परंतु लोकांना हे कसे समजेल? दुकाने चालतात. चालू द्या ना! उगाच आपण डोकेफोड का करावी? काळामुळे चालू राहिले आहे.
बाकी, तुम्ही जे म्हणता ते पुस्तकात सांगितले आहे. मग तुमच्यात आणि पुस्तकात फरक काय राहिला? जर तुम्ही जिवंत असून काही करु शकत नाही, मग त्यापेक्षा हे पुस्तक चांगले! काही पावर (शक्ती) असते की नाही? भले मोक्षाची पावर नसेल, पण संसार व्यवहाराची तर असेल ना? व्यवहारात सुद्धा शांती राहील असे काही सांगा. तुम्हाला जर शांती लाभली असेल, तर आम्हाला लाभेल. तुम्हालाच शांती वाटत नसेल मग आम्हाला कशी वाटेल?
परंतु ती रीत शिकवा हे तर गुरू सांगतात, 'मॉरल आणि सिन्सिअर व्हा. बी मॉरल आणि