________________
१०८
गुरु-शिष्य
म्हणून मला सांगावे लागते की हे जे तुम्ही व्याख्यान देत आहात, परंतु तुम्हाला फक्त स्वाध्याय करण्याचा अधिकार आहे. उपदेश देण्याचा अधिकार नाही. अधिकार नसूनही उपदेश दिला तर हा उपदेश कषायसहीत असल्यामुळे नरकात जाल. ऐकणारा नरकात जाणार नाही. ज्ञानी असून मला असे कठोर शब्द बोलावे लागतात. तेव्हा त्याच्या मागे किती करुणा असेल! ज्ञानींना कठोर होण्याची गरजच काय? ज्यांना अहर्निश परमानंद, अहर्निश मोक्ष वर्तत असतो, त्यानां कठोर होण्याची काय गरज? परंतु ज्ञानी असून असे कठोर बोलावे लागते की, 'सावधान राहा, स्वाध्याय करा' 'लोकांना तुम्ही असे सांगू शकता की, 'मी माझा स्वाध्याय करत आहे, तर तुम्ही ऐका'. परंतु कषायसहीत उपदेश देऊ नये.
वचनबळ तर हवेच ना
मी तुम्हाला उपदेश देत राहिलो तर तुम्ही शिकणार नाही. परंतु तुम्ही माझे वर्तन पाहाल तर ते तुम्हाला सहज शिकता येईल. म्हणून तिथे उपदेशाने काही साध्य होत नाही. ती वाणी व्यर्थ जाते. तरी आपण त्यास चुकीचे आहे असे म्हणू शकत नाही. कोणाचेच चुकीचे नसते. परंतु याचा काही अर्थच नाही, सर्व अर्थशून्य आहे. ज्या बोलण्यात काही वचनबळ नाही, त्यास काय म्हणाल? आपण त्यांना स्पष्टपणे सांगावे की 'तुमचे बोलणेच खोटे आहे.' व्यर्थ का जाते? तुमचे बोलणे माझ्यात रुजले पाहिजे. तुमचे बोलणे रुजतच नाही.' बोलणे किती वर्षाचे आहे? जुने बोलणे, ते रुजणार नाही. वाणी 'प्योर (शुद्ध) असावी, वचनबळसहित असावी. आपण सांगावे की, 'तुम्ही असे वचन बोला की ज्यामुळे माझ्यावर काही परिणाम होईल". वचनबळ तर मुख्य वस्तू आहे. मनुष्याजवळ वचनबळ नसेल तर काय कामाचे?
गुरू तर त्यांना म्हटले जाते की ते जी वाणी बोलतात ना, ती आमच्या आपोआपच परिणमित होते, अशी वचनबळ असलेली वाणी असते ! हे तर स्वतः क्रोध-मान-माया-लोभातच असतात आणि आम्हाला उपदेश देतात की, 'क्रोध-मान-माया-लोभ सोडा' म्हणून तर हा सगळा