________________
१०६
गुरु-शिष्य
ही तर उपदेशकाची चूक आहे. ही शाळेसारखी गोष्ट नाही. शाळेची गोष्ट वेगळी आहे. शाळेत मुले काही करत नाहीत, ते वेगळे आहे आणि हे वेगळे आहे. येथे तर आत्महितासाठी आले आहेत. ज्यात दुसरी कुठलीही वाईट दानत नाही. संसाराच्या हितासाठी आलेले नाहीत. म्हणून या उपदेशकांनीच सगळे काही करायला हवे.
___ मी तर सगळ्यांना सांगतो की, 'भाऊ, तुमच्याकडून जर काहीच होत नसेल तर ती माझीच चूक आहे. तुमची चूक नाही, 'तुम्ही माझ्याजवळ रिपेयर (दुरुस्त) करविण्यासाठी आलात की 'हे माझे रिपेअर करा' मग ते रिपेयर झाले नाही तर ती कोणाची चूक?
प्रश्नकर्ता : पंचवीस लोक बसले असतील, पाच जणांना प्राप्ती झाली आणि वीस जणांना प्राप्ती झाली नाही, तर त्यात गुरूंचीच चूक आहे का?
दादाश्री : गुरूचीच चूक. प्रश्नकर्ता : त्यांची कोणती चूक आहे ?
दादाश्री : त्यांचे चारित्र्यबळ नाही. त्यांनी चारित्र्यबळ विकसित करायला हवे. रात्री बर्फ ठेवला असेल, तर समजदार किंवा नासमजदार सर्वांवर त्याचा परिणाम नाही का होणार? थंडावा लागतोच ना? म्हणजे चारित्र्यबळ पाहिजे. परंतु यांच्याजवळ तर स्वतःचे चारित्र्यबळ नाही. म्हणून लोकांनी असे शोधून (!) काढले, आणि मग शिष्यावर चिडत राहतात. याला काही अर्थच नाही ना! ते बिचारे तर तसेच आहेत. ते घेण्यासाठी आले आहेत, त्यांच्याशी क्लेश-कटकट करायची नसतो.
अनुभवाची तर गोष्टच निराळी प्रश्नकर्ता : स्वतःला अनुभवाने ज्ञान प्राप्त होणे आणि दुसऱ्याने उपदेश दिल्यावर ज्ञान प्राप्त होणे, हे दोन्ही जरा समजवा.
दादाश्री : उपदेशाचे तर, आम्ही शास्त्रात (सांगितलेले) वाचतो ना, त्यासारखे आहे. परंतु उपदेशकांमध्ये जर कोणी पुरुष वचनबळवाला