________________
१०४
गुरु-शिष्य
मतभेद निर्माण केला तर मी त्याला तोंडावर सांगेन की 'तुमचा आत्मा कबूल करत आहे, पण तुम्ही विरुध्द बोलत आहात हे. मी असे म्हटल्यावर तो समजतो आणि कबूल करतो की स्वतः विरुद्ध बोलत आहे. कारण विरुद्ध बोलल्याशिवाय राहवत नाही ना! का विरुद्ध बोलतो? तर त्याने तसा माल भरून ठेवला आहे, आडमुठेपणाचा माल भरला आहे. म्हणून ज्याचे पुण्य वाकडे असेल त्याची श्रद्धा बसत नाही. नाही तर ज्ञानी पुरुषांना तर श्रद्धेची मूर्ती म्हणतात.
ज्ञानी, श्रद्धेची प्रतिमा ज्ञानी पुरुष असे असतात की त्या मूर्तिला पाहताक्षणीच श्रद्धा बसते. श्रद्धा बसेलच अशी मूर्ती ! श्रद्धेय म्हटले जातात. सगळ्या जगासाठी, सगळ्या वर्ल्डसाठी!! हा काळ असा विचित्र आहे की श्रद्धेची मूर्ती सापडत नाही. सगळ्या मूर्ती सापडतात, पण श्रद्धेची मूर्ती, निरंतर श्रद्धा बसेल अशी मूर्ती सापडतच नाही. जगात क्वचितच कधी श्रद्धेच्या मूर्तीचा जन्म होतो. श्रद्धेची मूर्ती म्हणजे पाहताक्षणीच श्रद्धा बसते. मग काही विचारावेच लागत नाही आपोआपच श्रद्धा बसते. शास्त्रकारांनी त्यांना श्रद्धेची मूर्ती म्हटली आहे. क्वचित काळी असे अवतार असतात, तेव्हा कल्याणच होते!! हा आमचा अवतारच असा आहे की आमच्यावर त्यांची श्रद्धा बसूनच जाते.
श्रद्धेची प्रतिमा व्हायला हवे. नालायक मनुष्याने सुद्धा एकदा चेहरा पाहिला की लगेचच श्रद्धा बसते. त्याक्षणी त्याचे भाव, त्याची परिणती बदलते, पाहाताक्षणीच पालटून जाते. अशी प्रतिमा, श्रद्धेची प्रतिमा क्वचितच कधी जन्म घेते. तीर्थंकर साहेब होते तसे!
म्हणजे कसे व्हायला हवे? श्रद्धेची प्रतिमा व्हायला हवे. परंतु श्रद्धा बसत नाही, याचे कारण काय असेल? स्वत:च! आणि हा, तर म्हणेल, 'लोक श्रद्धाच ठेवत नाहीत, तर काय करू'? आता ज्या गुरूंमध्ये योग्यता नसेल तेच असे बोलत राहतात की 'माझ्यावर श्रद्धा ठेवा.' अरे, पण लोकांना तुझ्यावर श्रद्धाच येतच नाही, त्याचे काय? तू असा बनून जा, श्रद्धेची प्रतिमा बन, की पाहताक्षणीच लोकांची तुझ्यावर श्रद्धा बसेल.