________________
गुरु-शिष्य
१०५
मग वैराग्य कसे येईल? प्रश्नकर्ता : जे लोक उपदेश करतात, त्यांचे आचरण त्यांच्या उपदेशापेक्षा वेगळे असते, मग श्रद्धा कशी उपजेल? असे सुद्धा होत असते?
दादाश्री : म्हणजे श्रद्धा बसणे ही काही सामान्य गोष्ट नाही. मनोरंजनासाठीच हे सगळे उपदेश असतात. कारण खरा उपदेश नाही हा. हे सर्व तर स्वत:चे मनोरंजन आहे.
प्रश्नकर्ता : हो. फक्त उपदेश रंजन असते आणि म्हणून तर वैराग्याचा रंग लागत नाही.
दादाश्री : वैराग्याचा रंग कुठे लागतो? कुठल्या वाणीने लागतो? तर जी वाणी सत्य असेल त्या वाणीने, ज्या वाणीचा उपयोग चुकीच्या मार्गाने होत नसेल, जी वाणी सम्यक् वाणी असेल, जिच्यात वचनबळ असेल, तिथे रंग लागतो. त्याशिवाय असेच वैराग्य कसे येईल? तशी तर पुस्तकेही सांगतातच ना! जसे पुस्तके सांगतात तरीही त्याला वैराग्य येत नाही, तसेच हे गुरू सांगतात त्यामुळेही वैराग्य येत नाही. पुस्तकांसारखेच गुरूही झाले आहेत. जर आपल्याला वैराग्य आले नाही तर समजावे की हे पुस्तकी गुरू आहेत. वचनबळ असले पाहिजे ना!
यात चूक उपदेशकाची प्रश्नकर्ता : कित्येक वेळा असे घडते की उपदेश ऐकण्यासाठी पंचवीस लोक बसले असतील, त्यातील पाच जणांवर उपदेशाचा परिणाम होतो आणि बाकीचे वीस तसेच्यातसेच कोरडे राहतात. तर यात उपदेशकाची चूक आहे की ग्रहण करणाऱ्याची चूक आहे?
दादाश्री : यात बिचाऱ्या ऐकणाऱ्याची काय चूक ? उपदेशकाची चूक आहे. ऐकणारे तर असेच आहेत. ते स्पष्टच सांगतात ना की, साहेब, आम्हाला काहीच येत नाही, म्हणून तर तुमच्याजवळ आलो आहोत. परंतु हा तर उपदेशकांनी रस्ता शोधून काढला आहे, स्वतःचा बचाव शोधून काढला आहे की, 'तुम्ही असे करत नाहीत, तुम्ही असे.....' असे म्हणू नये. ते तुमच्याजवळ मदतीसाठी आले आहेत आणि तुम्ही असे करता?