________________
१०२
गुरु-शिष्य
आपल्याला शिव्या दिल्या, मारले तरी सुद्धा आपली श्रद्धा तुटत नाही, ती अविचल श्रद्धा म्हटली जाते. असे घडते का? अशी श्रद्धा बसल्याशिवाय मोक्ष नाही, हे तुम्हास गॅरेंटीने सांगतो.
बाकी, आपल्याला अनुकूल वाटले नाही आणि घरी निघून गेलो, ती श्रद्धाच म्हटली जात नाही. म्हणजे तुम्ही अनुकूलता शोधत आहात की मोक्ष शोधता आहात? अनुकूलता वाटली नाही म्हणून तिथून निघून गेलात त्यास काय श्रद्धा म्हणायची तुम्हाला काय वाटते? श्रद्धा म्हणजे तर, सोपवून दिले सगळेच!
___ 'येथे' श्रद्धा येतेच आणि मी असे म्हणत नाही की, 'माझ्यावर तुम्ही श्रद्धा ठेवा.' कारण मी श्रद्धा ठेवा असे सांगणाऱ्यापैकी नाही. पन्नास हजार लोक येथे येत असतील तर त्यांना माझ्या म्हणण्यावर श्रद्धा ठेवण्यास मी मनाई करतो. सगळ्यांना सांगतो की माझे एक अक्षर देखील मानू नका, आमच्यावर श्रद्धा ठेवू नका. तुमचा आत्मा कबूल करेल तरच आमची गोष्ट स्वीकारा. तुम्ही स्वीकार करवाच असे आम्हाला कधीच वाटत नाही.
आमच्या वाणीने त्याला नक्कीच श्रद्धा बसते. कारण सत्य वस्तू जाणली जाते, म्हणून श्रद्धा बसते, ती मग जात नाही. हे तर सत्य ऐकण्यास मिळाले नाही, म्हणून श्रद्धा बसत नाही आणि सत्य ऐकण्यास मिळाले म्हणजे श्रद्धा बसल्याशिवाय राहणारच नाही. आम्ही नाही म्हटले तरीही श्रद्धा बसूनच जाते. कारण मनुष्य सत्य गोष्ट सोडायला मागत नाही, जरी शिव्या दिल्या तरीही. तुम्ही 'श्रद्धा ठेवायचीच नाही' असे जरी निश्चित कराल तरीही देखील श्रद्धा येथेच बसेल. तुम्ही म्हणाल की 'आपले होते ते काय वाईट होते?' पण तरी आमच्यावर श्रद्धा बसेलच. आणि म्हणूनच स्वत:ची बऱ्याच काळाची श्रद्धा, अनंत जन्मांची श्रद्धा एकदम तोडण्यास तयार होतो. का? तर त्याची अशी श्रद्धाच बसते की हे आजपर्यंत ऐकलेले-जाणलेले सगळेच चुकीचे निघाले. आजपर्यंत ऐकलेले चुकीचे ठरते तेव्हा आपल्याला असे नाही का वाटत की ही तर आत्तापर्यंतची आपली सर्व मेहनत वाया जात आहे ?