________________
१००
गुरु-शिष्य
असे देहकर्मी असाल तर मी तुमच्याकडे आकर्षित होईन. तुम्हाला पाहून मला उल्हासच येत नाही ना, तुमचा चहेरा सुंदर असता तरी कदाचित उल्हास वाटला असता. परंतु चेहरा सुद्धा सुंदर नाही, शब्द सुद्धा सुंदर नाहीत. म्हणजे प्रभावशालीही नाही, आणि चांगले बोलताही येत नाही. मग येथे असे चालणारच नाही. जरी ज्ञान सुंदर असेल तरीही श्रद्धा बसेल. माझे ज्ञान सुंदर आहे त्यामुळे श्रद्धा बसतेच. सुटकाच नाही! आणि बाहेर तर फक्त शब्द सुंदर असतील तरी चालेल.
आता बोलता येत नसेल तरी सुद्धा जेव्हा आपण तिथे बसू तेव्हा आपले डोके शांत झाले तर समजा की येथे श्रद्धा ठेवण्यासारखी आहे. जेव्हा जाऊ तेव्हा, उबग आल्यावर तिथे गेलो आणि मनःस्थिती शांत झाली तर जाणावे की येथे श्रद्धा ठेवण्यासारखी आहे. वातावरण शुद्ध असेल तर समजून जा की ही शुद्ध व्यक्ती आहे, मग तिथे श्रद्धा बसेल.
शोधणारा तर असा नसतो श्रद्धा तर अशी बसली पाहिजे की हातोडा मारून घालवायची म्हटली तरी सुद्धा हालत नाही. बाकी, जे श्रद्धा बसवतात ती मग उठते (निघून जाते). श्रद्धा उठली असेल तिला बसवावी लागते आणि बसली असेल तिला उठवावी लागते. जगात अशी श्रद्धेची उठ-बस, उठ-बस होतच राहणार. एका जागी सहा महिने श्रद्धा राहिली तर दुसऱ्या जागी दोन वर्षे श्रद्धा राहील, तर कुठे पाच वर्ष श्रद्धा राहील, पण नंतर उठून जाते.
म्हणून या जगात कुठेही श्रद्धा ठेवूच नका, जिथे ठेवाल तिथे फसाल. श्रद्धा आपोआपच आली तरच 'तिथे' (त्यांच्याकडे) बसा. श्रद्धा बसली पाहिजे. 'ठेवलेली' श्रद्धा किती दिवस टिकेल?
एका शेठने सांगितले, 'माझी तर बापजींवर खूप श्रद्धा आहे.' मी विचारले, 'तुम्हाला कशामुळे श्रद्धा आहे?' या शेठ, या शेठ असे म्हणून सगळ्यांच्या उपस्थितीत बोलावतात म्हणून तुमची श्रद्धा बसेलच ना! जी (सत्य) शोधणारी व्यक्ती असेल ती काय अशी श्रद्धा बसवेल? मी तर शोधणारा होतो. मी बापजींना म्हटले की, 'असे काही बोला की माझी