________________
गुरु-शिष्य
१०१
श्रद्धा बसेल. तुम्ही चांगले-चांगले बोलता की या अंबालालभाई, तुम्ही मोठे कॉन्ट्रॅक्टर आहात, असे आहात, तसे आहात, हे मला आवडत नाही. तुम्ही गोड-गोड बोलून श्रद्धा बसवाल त्यास काही अर्थ नाही. मला शिव्या देऊन सुद्धा असे काही बोला की माझी श्रद्धा बसेल. बाकी, हे 'यावे यावे' असे म्हटले तर हळूहळू लोकांची श्रद्धा बसते. म्हणून 'आम्हाला येथे चांगले वाटते' असे ते म्हणतील.
प्रश्नकर्ता : पण शिकले-सवरलेले विद्वान लोक लगेच समजतात ना?
दादाश्री : हो, पण सगळे शिकले-सवरलेले लोक लगेच समजतात की हे सगळे खोटे आहे, खोटे कुठपर्यंत चालवून घेतील? ।
श्रद्धा बसावी, म्हणून तर 'हे अमके शेठ यावे, यावे' असे म्हणतात. पण मग या शेठला बोलवत राहता आणि त्या भाऊंना का बोलवत नाही? त्यांना मनात वाटते की हे शेठ कधी तरी उपयोगी पडतील. चष्मा वगैरे मागवायचा असेल, काही मागवायचे असेल, काही हवे असेल तर कामाचे आहेत. आता ते शेठ तसे तर काळाबाजार करत असतील, बापजींना हे माहीतही असते. परंतु ते समजतात की, 'आम्हाला काय? काळाबाजार करतील तर ते भोगतील पण आम्ही चष्मा मागवू ना!' आणि शेठ काय समजतात की, 'काही हरकत नाही, बघा ना, बापजी अजूनही मान देतात ना!' तेव्हा आम्ही काही बिघडलेलो नाही.' बिघडले आहे असे ते कधी मानतील? तर जेव्हा बापजी त्यांना म्हणतील, ‘ए, तुम्ही असे धंदे करत असाल तर येथे येऊ नका.' त्यामुळे मग शेठच्या मनात येऊ शकते की आता हा धंदा बदलावा लागेल, कारण बापजी आता येऊ देत नाहीत. म्हणजे 'यावे यावे' म्हटल्यावर बसलेली श्रद्धा टिकेल का? अशी श्रद्धा किती दिवस राहील? सहा-बारा महिने राहते, आणि नंतर उडून जाते.
अशा श्रद्धेशिवाय मोक्ष नाही म्हणजे श्रद्धा तर, मी शिव्या दिल्या तरी सुद्धा राहील, तीच खरी श्रद्धा! मान मिळाल्यामुळे थोडा काळ श्रद्धा बसली असेल, पण ती मग उडून जाते. अपमान करतात तिथे सुद्धा श्रद्धा बसते, मग ती बसलेली श्रद्धा उडत नाही. तुमच्या लक्षात आले ना? एकदा श्रद्धा बसल्यानंतर