________________
गुरु-शिष्य
गोंद संपला असेल तर खळ लावा, तरी चिकटेल!!' म्हणजे श्रद्धा तर त्याचे नाव की चिकटवली की चिकटून बसते, नंतर निघणारच नाही. त्यावर कितीही छाप मारत राहिलात तरी छाप थकून जाईल पण तिकीट निघणार नाही.
तिथे श्रद्धा येतेच प्रश्नकर्ता : ही श्रद्धा कशाच्या आधारे येते? ।
दादाश्री : गुरूंच्या चारित्र्याच्या आधारे येते. चारित्र्यबळ असते! जिथे वाणी, वर्तन व विनय मनोहर असते तिथे श्रद्धा बसवावी लागत नाही, श्रद्धा बसलीच पाहिजे. मी तर लोकांना सांगतो ना, की येथे श्रद्धा ठेवूच नका, तरी देखील श्रद्धा बसतेच. आणि दुसऱ्या जागी ठेवलेली श्रद्धा जरा 'असे' केले ना तर लगेच उडून जाते. म्हणून जिथे वाणी, वर्तन व विनय मनोहर असतील, मनाचे हरण होईल, असे असतील तिथे खरी श्रद्धा बसते.
प्रश्नकर्ता : श्रद्धा बसण्यासाठी मुख्य वस्तू वाणी आहे का?
दादाश्री : ते बोलू लागले की आपली श्रद्धा लगेच बसते की, 'ओहोहो, हे कसे बोलत आहेत?' त्यांच्या बोलण्यावर श्रद्धा बसली ना की मग कामच झाले. मग कधी श्रद्धा बसते आणि कधी श्रद्धा बसत नाही, असे होता कामा नये. आपण जेव्हाही जाऊ, तेव्हा ते जे बोलतील त्यावर आमची श्रद्धा बसते. त्यांची वाणी अशी फर्स्ट क्लास असते. जरी सावळे असतील किंवा तोंडावर देवीचे व्रण असतील पण वाणी फर्स्ट क्लास बोलत असतील तर आपल्याला समजेल येथे आपली श्रद्धा बसेल.
प्रश्नकर्ता : मग, श्रद्धा येण्यासाठी आणखी काय काय असावे?
दादाश्री : असे प्रभावशाली असतात की पाहताक्षणीच मनात भरतात. म्हणजे देहकर्मी असले पाहिजेत. आम्ही म्हणू की भले बोलू नका पण असे काही लावण्य दाखवा की माझी श्रद्धा बसेल. परंतु हे तर लावण्य सुद्धा दिसत नाही, मग श्रद्धा कशी बसेल? म्हणजे तुम्ही जर