________________
गुरु-शिष्य
त्यांना पाहिल्यावरच,त्यांच्याशी बोलल्यावरच श्रद्धा बसते. ज्ञानी पुरुषांना श्रध्देची मूर्ती म्हटले जाते. ते तर कल्याणच करतात! नाही तरी तुमची श्रद्धाच फळ देते.
श्रद्धा ठेवावी की उत्पन्न व्हावी? प्रश्नकर्ता : सगळ्या धर्मात मी माझ्या दृष्टीने पारखून पाहिले आहे, परंतु मला आत्तापर्यंत कुठेही श्रद्धा उत्पन्न झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. असे का झाले असावे? तिथे मग काय करावे?
दादाश्री : परंतु श्रद्धा उत्पन्न होईल असे स्थान तर हवे ना? तोपर्यंत श्रद्धा हितकारी जागेवर बसत आहे की अहितकारी जागेवर, इतकेच पाहावे. आपली श्रद्धा हितकारीवर बसत असेल, दृढ होत असेल तर हरकत नाही. परंतु अहितकारीवर श्रद्धा बसता कामा नये.
प्रश्नकर्ता : मला कोणत्याही प्रकारे, कोणत्याही धर्मात किंवा व्यक्तीमध्ये श्रद्धा उत्पन्न होत नाही. याचे काय कारण असेल? उच्च कक्षेच्या म्हटल्या जाणाऱ्या संतांच्या सत्संगात सुद्धा शांतीचा अनुभव होत नाही, त्यात दोष कोणाचा?
दादाश्री : जिथे खरे सोने मानून आम्ही गेलो, तिथे रोल्ड गोल्ड (खोटे) निघाले, की मग श्रद्धा बसतच नाही ना! मग दुधाने भाजलेली व्यक्ती, ताक सुद्धा फुकून पिते!
प्रश्नकर्ता : गुरुंवर श्रद्धा तर ठेवावी लागते ना?
दादाश्री : नाही, श्रद्धा ठेवावी लागते असे नाही, श्रद्धा उत्पन्न व्हायला हवी! श्रद्धा ठेवावी लागत असेल तर तो गुन्हा आहे. श्रद्धा आपल्यात उत्पन्न व्हायला हवी.
प्रश्नकर्ता : गुरूंवर श्रद्धा ठेवली, अधिक श्रद्धा ठेवली, तर त्या श्रद्धेमुळे आपल्याला अधिक प्राप्ती होते ना?
दादाश्री : परंतु असे आहे की, ठेवलेली श्रद्धा चालत नाही, आपली श्रद्धा बसली पाहिजे.