________________
गुरु-शिष्य
आता गुरुंच्या उणिवा का काढता? उणिवा काढणारे कधीही मोक्षला गेले नाहीत, परंतु नरकात गेले आहेत.
___ नंतर मात्र गुरूचे दोष काढूच नयेत तेव्हा कोणी चांगले गुरू शोधून काढावे की जे आपल्या हृदयास पटतील. असे गुरू शोधावे लागतील. आपल्या मनाला आनंद वाटेल असे गुरू हवेत. गुरू केल्यानंतर कायम मन संतुष्टी राहील, आपले मन त्यांच्याविषयी कधीच बिघडणार नाही असे असेल तर गुरू करावेत. हो, नाही तर नंतर त्यांच्याशी आपली लठ्ठालठ्ठी होईल. एकदा त्यांच्यावर मन स्थिरावल्यानंतर लठ्ठालठ्ठी होणार असेल तर ती लठ्ठालठ्ठी करू नका. एकदा का त्यांच्यावर मन स्थिरावले आणि पुन्हा आपल्या बुद्धीने चाचपू लागलो की, 'हे गुरू असे कसे निघाले?' तर मात्र चालणार नाही. बुद्धीला सांगावे की, 'ते असे असूच शकत नाहीत. आम्ही जसे पहिल्यांदा पाहिले होते तेच हे गुरू आहेत!"
___ म्हणून आम्ही काय म्हटले? की जे तुझ्या डोळ्यात भरतील असे असतील त्यांनाच गुरू बनव. मग जर कधी गुरू तुझ्यावर चिडले तर तू ते पाहू नकोस. प्रथम जे डोळ्यात भरले होते, जसे पाहिले होते, तसेच्या तसेच दिसले पाहिजेत. आपणच पसंत केले होते ना! या मुली नवरा पसंत करतात, त्यावेळी जे रूप पाहिले होते, आणि त्यानंतर त्या नवऱ्याला देवी जरी आल्या तरी त्या आधी पाहिले होते तेच रुप ध्यानात ठेवतात! काय करणार मग? तरच जगता येईल, नाही तर जगताच येणार नाही. त्याच प्रमाणे ज्याला स्वछंदपणा काढून टाकायचा असेल, त्याने गुरूला अशा त-हेनेच पाहावे. गुरूची चूक काढू नये. गुरू केले म्हणजे केले, नंतर त्यांचा एकही दोष दिसायला नको, अशाप्रकारे तू वाग. नाही तर दुसऱ्या गुरूकडे जाऊ शकतोस. अर्थात गुरू आपल्या डोळ्यात भरतील असे शोधून काढावे आणि नंतर त्यांचे दोष काढू नये. परंतु लोकांना हे समजत नाही आणि गुरू करून बसतात.
खरोखर तर श्रद्धाच फळते प्रश्नकर्ता : गुरूंवर जर आमची श्रद्धा असेल, मग गुरू कसेही असतील, परंतु आपली श्रद्धा असेल तर ती श्रद्धा फळते की नाही फळत?