________________
गुरु-शिष्य
दिलेत तर मोठी जवाबदारी आहे. गुरूंचा अधांतरी घात करणे त्यापेक्षा तर आत्मघात करणे चांगले.
उत्थापन, हा तर भयंकर गुन्हा गुरूला गुरूच्या रुपात मानू नका आणि मानलेत तर मग पाठ फिरवू नका. तुला ते पसंत नसेल तर लोटा ठेव! लोटा ठेवण्यास हरकत नाही. लोट्याला नमस्कार कर, मग जर बुध्दीने चूळबूळ केली नाही, तर तुझे काम होईल. आता इतके सगळे सांभाळणे कोणाला शक्य आहे? हे सगळे कसे काय समजेल?
प्रश्नकर्ता : गुरू करताना ते चांगले वाटतात. सद्गुणी वाटतात की यांच्यासारखा तर कोणीच नाही. परंतु एकदा गुरू केल्यानंतर काही गडबड आहे असे जर समजले तर काय करावे?
दादाश्री : त्यापेक्षा तर स्थापन करूच नये. लोटा ठेवणे चांगले, तो कधी उकरावा तर लागत नाही. लोट्याची काही झंझटच नाही ना! तसा लोटा काही इतके सगळे काम करत नाही, पण तरी खूप मदत करतो.
प्रश्नकर्ता : गुरूची स्थापना तर केली, परंतु बुद्धी काही एकदम निघून जात नाही, म्हणून तिला उलटे दिसते. त्याला तो तरी काय करणार?
दादाश्री : तसे दिसते, परंतु स्थापना केली, म्हणून आता उलटे करु नये. एकदा स्थापना केली, की मग बुद्धीला सांगावे की, 'येथे तुझे राज्य राहणार नाही, हे माझे राज्य आहे, येथे तुझी आणि माझी, दोघांची स्पर्धा आहे. आता मी आहे आणि तू आहेस.'
एक वेळा स्थापन करून मग उकरणे, तो तर भयंकर गुन्हा आहे. त्याचेच दोष लागले आहेत या हिंदुस्तानातील लोकांना! यांना तर गुरूची स्थापनाच करता येत नाही. आज स्थापना करतात आणि उद्या तर उत्थापन करतात. परंतु असे चालणार नाही. गुरू जे काही करत असतील, परंतु स्थापना केल्यानंतर तू त्यात कशासाठी डोकेफोड करतोस? एकदा का मन बसले की, 'माझी हरकत नाही' असे म्हणून तुम्ही गुरू केलेत. मग