________________
गुरु-शिष्य
प्रश्नकर्ता : घड्याला गुरू बनवले, तरी देखील लाभ झाला?
दादाश्री : लाभ तर त्याला होणारच ना! असे प्रत्यक्षपणे नाही केले परंतु अप्रत्यक्षपणे तर केले ना! नेमीनाथ भगवंतांना नमस्कार तर केलाच ना! मग ते असे आहे की, इतके छोटे-छोटे बालक असतात, त्यांचे आई-वडील त्यांना म्हणतात की, 'दादाजींना नमस्कार कर.' परंतु बालक नमस्कार करत नाही. जेव्हा पुन्हा पुन्हा नमस्कार करायला लावतात तेव्हा असा मागे उभा राहून नमस्कार करतो. हे काय सूचित करते? अहंकारच आहे तो सगळा! त्याचप्रमाणे भीमाला सुद्धा अहंकार होता, म्हणून अशा तहेने घडा ठेवून सुद्धा केले. तरी देखील त्याला लाभ तर नक्कीच झाला. हो, खरोखर असे घडले. त्यावेळी नेमीनाथ भगवंत जिवंत होते.
प्रश्नकर्ता : म्हणजे ते प्रत्यक्ष होते? दादाश्री : हो. ते प्रत्यक्ष होते. प्रश्नकर्ता : म्हणून एकंदरीत तर त्यांचीच भक्ती केली.
दादाश्री : हो, पण नामाने आणि स्थापनेने नेमीनाथ भगवंताची आराधना केली!
प्रश्नकर्ता : परंतु घड्याला आम्ही गुरू बनवले, तर तो जड पदार्थ झाला ना?
दादाश्री : असे आहे की, या दुनियेत जे काही डोळ्याने दिसते ते सगळे जड आहे, एकही चैतन्य दिसत नाही.
प्रश्नकर्ता : आपल्याला कोणी प्रश्न विचारला आणि आपण उत्तर देता, त्याप्रमाणे घडा तर उत्तर देत नाही ना?
दादाश्री : घडा उत्तर देत नाही. परंतु गुरू बनवून तुम्ही गुरूंचे आबाळ करणार असाल, म्हणजे नंतर तुम्ही बिघवडणार असाल, तर गुरू करू नका आणि नेहमी सरळ वागणार असाल तरच गुरू करा. मी तर खरा सल्ला देतो. मग जसे करावेसे वाटेल तसे करा. अधांतरी सोडून