________________
गुरु-शिष्य
दुनियेत गुरू करण्यास जर कोणाला आले असेल तर ते या खोजा लोकांना! तुमच्या गुरूंनी असा विवाह केला असेल, अरे, विवाह केला नसेल परंतु कोणाला जरासे ओरडले असतील तरी तुम्ही सगळे त्यांना मारता. या खोजा लोकांच्या गुरूंनी तर विवाह केला एका युरोपियन लेडीबरोबर! आणि त्या सगळ्या लोकांनी उसोहळा साजरा केला की आपले गुरू तर एका युरोपियन लेडीबरोबर विवाह करीत आहेत! यांना म्हणतात शिष्य. गुरूंचे उणे काढू नये. सगळ्यांचे उणे काढा, पण गुरूंचे उणे काढू नका. त्यात फार मोठी जोखीम आहे. नाही तर गुरू करूच नका.
मी गुरूंची आराधना करण्यास सांगत नाही, पण त्यांची विराधना करू नका. आणि जर आराधना केली तर कामच झाले, परंतु इतकी अधिक आराधना करण्याची शक्ती मनुष्यात नसते. मी काय म्हणतो की वेड्याला गुरू बनवा, अगदी वेड्याला गुरू बनवा, परंतु आयुष्यभर त्याच्याशी 'सिन्सियर' राहा, तर तुमचे कल्याण होईल. पूर्ण वेड्या गुरूशी सिन्सियर राहिल्याने तुमचे सर्व कषाय संपून जातील! पण एवढे समजले पाहिजे ना! एवढी बुद्धी चालली पाहिजे ना! म्हणूनच तर तुमच्यासाठी दगडाचे देव स्थापन केले, की ही प्रजा अशी आहे, म्हणून दगडाचे देव बसवा म्हणजे मग उणे काढणार नाहीत. तर म्हणे, 'नाही, दगडात सुद्धा उणे काढतात की हा श्रृंगार योग्य नाही!' ही प्रजा अति विचार करणारी आहे ! अति विचारवंत, गुरूंचे दोष बघणारे लोक. स्वत:चे दोष बघण्याचे सोडून, गुरूंचे दोष बघतात! इतकी अधिक तर त्यांची अलर्टनेस (जागरूकता) आहे !
___ आम्ही खात्री देतो की कोणत्याही वेड्याला गुरू केले आणि आयुष्यभर त्याला निभावून घेतले तर तीन जन्मात मोक्ष होईल असे आहे. परंतु गुरू जिवंत असला पाहिजे. म्हणून तर लोकांना हे परवडले नाही आणि मूर्ती ठेवली.
माझे काय म्हणणे आहे की स्वतः ठरवलेले गुरू सोडू नये. गुरू करणे ही काही सोपी गोष्ट नाही. गुरू करा पण उत्तम प्रकारे पारख करून मगच करा.