________________
गुरु-शिष्य
दादाश्री : ठीक आहे, विचारून पक्के केले ते चांगले. प्रत्येक गोष्ट विचारून पक्की करावी.
म्हणजे आपण त्यांचा तिरस्कार करता कामा नये. ज्यांना गुरू केले असेल त्यांचा तिरस्कार करणे म्हणजे भयंकर गुन्हा म्हटला जातो. आपण त्यांच्याकडून काही तरी मिळवले होते ना? काही तरी मदत झालीच असेल ना? त्यांनी तुम्हाला एखादी पायरी तर चढवली असेल ना? म्हणून तुम्ही त्यांचे उपकार मानले पाहिजेत. म्हणजे आत्तापर्यंत जे प्राप्त झाले, त्याचे उपकार तर आहेतच ना! आपल्याला काही लाभ झाला तो विसरू शकत नाही ना! म्हणून गुरूंना सोडायचे नसते, त्यांचे दर्शन करायला हवे. त्यांना सोडले तर त्यांना दु:खं होईल, मग तो आपला गुन्हा म्हटला जाईल. तुमचे उपकार माझ्यावर असतील आणि मी तुम्हाला सोडून दिले तर तो गुन्हा म्हटला जाईल. म्हणून सोडता कामा नये, नेहमीच उपकार मानले पाहिजेत. एखादा छोटा उपकार जरी केला असेल आणि विसरून गेला, तर ती व्यक्ती खरी म्हटली जात नाही.
म्हणून गुरू असू द्या. गुरू असू द्यावे. गुरूंना दूर करु नका. कोणीही गुरू असेल तर त्यांना हटवण्याची गोष्ट करू नये. या दुनियेत हटवण्यासारखे काहीच नाही. हटवायला जाल तर आपण ज्यांच्या आधाराने चालत होता, त्यांचे विरोधी झालात असे म्हटले जाईल. विरोधी होण्याची आवश्यकता नाही.
शिष्याच्या दृष्टिकोनातून प्रश्नकर्ता : कोणत्या प्रकारच्या गुरूंना शरण गेले तर आत्म उन्नती संभव आहे?
दादाश्री : गुरू म्हणजे कधीच, आयुष्यभर आपल्या मनातून उतरणार नाहीत असे गुरू असावेत. जेव्हा पाहू तेव्हा मनात उल्हासच वाटला पाहिजे. जर असे गुरू भेटले तर त्यांना शरण जा.
प्रश्नकर्ता : आम्हाला वाईट विचार आला आणि लगेचच आम्ही भावना बदलतो. परंतु यात आपल्याला गुरूकृपा कितपत सहाय्यक होते?