________________
८६
गुरु-शिष्य
जरी काहीही केले तरी मी माझी दृष्टी बिघडवणार नाही. कारण ते कर्माधीन आहे. जे दिसत आहे ते सर्व कर्माधीन आहे. मी जाणतो की त्यांना कर्माच्या उदयाने घेरले आहे. म्हणून दुसऱ्या दृष्टीने बघू नये. जर झाड कापायचेच होते तर त्याचे पालन-पोषण करायचे नव्हते, आणि पालन-पोषण केले तर आता कापू नकोस. हा आमचा सिद्धांत आहे पहिल्यापासूनच! तुमचा सिद्धांत काय आहे ? वेळ आली तर सरळ कापून टाकायचे ?
म्हणून ज्यांची पूजा करता, त्यांना उपटून टाकू नका. नाही तर ज्यांची पूजा केली आहे, चाळीस वर्षांपासून ज्यांना पुजले आहे आणि एक्केचाळीसाव्या वर्षी उडवून टाकले, कापले तर चाळीस वर्षाचे तर गेले आणि वर दोषाने बांधले गेले.
तुम्ही नमस्कार करू नका आणि केला तर मग त्यांच्याविषयी पूज्यता नष्ट होता कामा नये. पूज्यता नष्ट होऊ नये हेच या जगाचे सार आहे ! एवढेच समजायचे आहे.
यात दोष कोणाचा ?
प्रश्नकर्ता : परंतु या जगात आम्ही ज्या व्यक्तीला पूज्य मानतो, ती जोपर्यंत आमच्या अनुरूप असेल तोपर्यंत संबंध टिकतो आणि जर त्यांच्याकडून थोडेसे जरी उलटसुलट झाले की आमचा संबंध बिघडतो !
दादाश्री : हो, ते मातीमोल होते. बिघडते एवढेच नाही, परंतु विरोधी बनून जातो.
प्रश्नकर्ता : त्यांच्यासाठी जो भाव होता, तो सगळा संपला.
दादाश्री : संपला आणि वर विरोधी बनला.
प्रश्नकर्ता : मग यात चूक कोणाची ?
दादाश्री : ज्याला उलटे दिसते ना, त्याचाच दोष! उलटे नाहीच काही या जगात. बाकी, जग तर पाहण्या - जाणण्यासारखे आहे, दुसरे काय? उलटे आणि सरळ असे तुम्ही कशास म्हणता ? तर ती बुद्धी आपल्याला उकसावत असते.