________________
गुरु-शिष्य
प्रश्नकर्ता : उलटे-सरळ पाहणे हा पाहणाऱ्याचा दोष आहे, असे तुम्ही म्हणता ना?
दादाश्री : हो, तो बुद्धीचा दोष आहे. आपल्याला समजले पाहिजे की हे 'उलटे आणि सरळ' दाखवणारी बुद्धी आहे. तेव्हा आपण बुद्धीचे ऐकू नये. बुद्धी आहे तोपर्यंत ती असे सर्व करणारच. परंतु आपल्याला समजले पाहिजे की हा कोणाचा दोष आहे! आपल्या डोळ्यांनी उलटे दिसत असेल तर आपल्याला कळून येते की डोळ्यांनी तसे पाहिले!!
सन्निपात, तरीही तीच दृष्टी । ज्ञानी पुरुषांना किंवा गुरूंना किंवा कोणालाही पूजले असेल आणि त्यानंतर जर कधी त्यांना सन्निपात झाला, तर ते चावायला धावतात, मारतात, शिव्याही देतात पण तरीही त्यांचा एकही दोष पाहू नये. सन्निपात झाला असेल आणि शिव्या दिल्या तर किती लोक धीराने घेऊ शकतील? म्हणजे तशी समजच नाही. गुरू तर तेच आहेत पण प्रकृतीत बदल झाला. मग कोणाचीही प्रकृती असो, सन्निपात होण्यास वेळच लागत नाही ना! कारण हे शरीर कशाचे बनलेले आहे ? कफ, वायु व पित्ताचे बनलेले आहे. आत कफ, वायु आणि पित्ताने जरा उसळी मारली की सन्निपात होतो!
गुरू-पाचवी घाती आजच्या या पाचव्या आऱ्यातील (कालचक्राचा एक भाग) जे सर्व जीव आहेत ते कसे आहेत? पूर्वविराधक जीव आहेत. म्हणून गुरुंमध्ये जर प्रकृतीच्या दोषामुळे चुका झाल्या तर गुरूंचे दोष बघतात व विराधना करतात. गुरू केल्यानंतर जर विराधना करणार असाल, तुमचा कमकुवतपणा जर पुढे येणार असेल तर गुरू करू नका. नाही तर भयंकर दोष आहे. गुरू केल्यानंतर त्यांची विराधना करू नका. कसेही गुरू असतील तरी शेवटपर्यंत त्यांच्या आराधनेतच राहा. आराधना जरी नाही झाली तरी विराधना तर करूच नका. कारण गुरूंची चूक पाहणे ही पाचवी घाती आहे. म्हणून तर असे शिकवतात की, 'भाऊ, हे बघ, गुरू