________________
गुरु-शिष्य
हे पाचवी घाती आहे, म्हणून जर गुरूंची काही चूक दिसली तर तू मारला गेलास असे समज.'
एक माणूस माझ्याकडे आलेला, तो मला सांगत होता की, 'माझ्या गुरूंनी मला सांगितले होते, की 'तू इथून जा, आता पुन्हा कधी आमच्याजवळ येऊ नकोस.' तेव्हापासून मला तिथे जावेसे वाटत नाही.
तेव्हा मी त्याला समजावले की गेला नाहीस तरी हरकत नाही पण गुरूंची माफी मागून घे ना! जो माफी मागेल तो इथून, या दुनियेतून मुक्त होईल. तोंडी तर माफी मागितली, आता मनाने पण माफी मागायची. आणि तुला या चिठ्ठीत जे लिहून दिले आहे त्याप्रमाणे घरी प्रतिक्रमण करत रहा. मग त्याला प्रतिक्रमण विधी लिहून दिली.
तू ज्यांना गुरू केले आहेस, त्यांची निंदा करू नकोस. कारण इतर सर्व उदयकर्माच्या अधीन आहे. मनुष्य काहीच करू शकत नाही. आता अशावेळी हरकत न घेणे हाही एक गुन्हाच आहे ! परंतु हरकत वीतरागतेने घ्यावी, अशी त्यांच्यावर धूळ उडवून नाही. 'असे व्हायला नको,' इतके तुम्ही त्यांना सांगू शकता, पण सर्व वरवर! कारण ते उदयकर्माच्या अधीन आहेत. मग त्यांचा दोष काढून काय फायदा? तुम्हाला कसे वाटते?
प्रश्नकर्ता : हो, बरोबर आहे.
दादाश्री : दुसरे म्हणजे गुरूंचे जे उपकार आहेत, ते उपकार मानले पाहिजेत. कारण त्यांनी तुम्हाला या सीमेच्या बाहेर काढले, तो उपकार विसरू नका. ज्या गुरूंनी इतके भले केले त्यांचे गुण विसरून कसे चालेल? म्हणून त्यांच्याकडे जायला पाहिजे. आणि गुरू अवश्य करावे व एक गुरू केल्यानंतर त्या गुरूंबद्दल अजिबात भाव बिघडवता कामा नये, एवढेच सांभाळायचे, बस.
गुरूंसाठी उलटा विचार करु नये. गुरूंनी जर शिष्याला म्हटले की, 'तुला अक्कल नाही' तर शिष्य तिथून निघून जातो. त्याला अपमान वाटतो म्हणून निघून जातो. तिथे तो