________________
८४
गुरु-शिष्य
कालपर्यंत लोक त्यांना मानत होते आणि मग गुरूंनी वेडेपणा केला तर शिव्या देऊ लागले. हव्या तशा शिव्या देऊ लागले. अरे, मग त्यांना मानलेच कशासाठी? आणि जर मानले तर आता शिव्या देणे बंद कर. आतापर्यंत पाणी पाजून झाड वाढवले, त्या झाडालाच तू कापून टाकलेस? तुझी काय अवस्था होईल? गुरूंचे जे व्हायचे ते होईल पण तुझी काय दैनाअवस्था होईल?
प्रश्नकर्ता : आम्ही मनात गुरूंसाठी काही उच्च कल्पना केली असेल, ती खंडित होते म्हणून असे घडत असेल का?
दादाश्री : एक तर गुरू करु नका, आणि केल्यानंतर गुरूंनी जरी वेडेपणा केला तरीही तुमची दृष्टी बदलता कामा नये.
पाहू नये चूक कधी गुरूंची हे तर पाच दिवसातच गुरूंची चूक काढतात. तुम्ही असे का करता? अरे, त्यांची चूक काढता! गुरूंची चूक काढतात का हे लोक?
प्रश्नकर्ता : गुरूंची चूक कधीच काढू नये.
दादाश्री : हो, पण ते चूक काढल्याशिवाय राहतच नाहीत ना! हे कलियुगातील लोक! म्हणून मग अधोगतीत जातात. आताचे गुरू परफेक्ट नसतात. आता परफेक्ट गुरू कुठून आणणार? हे गुरू तर कसे? कलियुगातील गुरू!
समजा गुरूंकडून चूक झाली तरी सुद्धा तू जर त्यांचा शिष्य असशील तर तू त्यांना सोडू नकोस. कारण दुसरा सर्व कर्माचा उदय असतो. असे नाही का समजत तुला? तू कशासाठी दुसरे काही पाहतोस? त्यांच्या पदाला तू नमस्कार कर ना! ते जे करतात, ते तू पाहायचे नाहीस. हो, त्यांचा उदय आला आहे, म्हणून ते भोगत आहेत. त्यात तुझे काय देणेघेणे? तुला त्यांचे पाहण्याची गरजच काय? त्यांच्या पोटात मुरड पडली म्हणून काय त्यांचा गुरूपणा निघून गेला? त्यांना एक दिवस उलटी झाली तर काय त्यांचा गुरूपणा निघून गेला? तुमच्या कर्माचा उदय होतो मग त्यांच्या कर्माचा उदय होत नसेल? तुम्हाला कसे वाटते?