________________
गुरु-शिष्य
दादाश्री : हो, त्या सगळ्यांची गरज आहे ना! पाच आज्ञा पालन करण्याची गरज, सगळ्यांचीच गरज !
प्रश्नकर्ता : अर्थात गुरूंची गरज आहेच ना?
दादाश्री : गुरूंची गरज नाही. हे सगळे साध्य झाल्यावर मग कोण गुरू? साधकाचे गुरू असतात. मला साठ हजार लोक भेटले आहेत, त्यांनी गुरू करण्याची गरज नाही.
प्रश्नकर्ता : मग त्यांना सत्संगाची गरज आहे का?
दादाश्री : हो, सत्संगाची गरज आहे आणि पाच आज्ञा पाळण्याचीही गरज आहे.
प्रश्नकर्ता : आपण जेव्हा येथे असाल तेव्हा रोज येण्याची गरज आहे ना?
दादाश्री : मी जेव्हा येथे असेल तेव्हा लाभ घ्या. रोज नाही आलात व महिन्याने आलात तरी हरकत नाही.
प्रश्नकर्ता : तुमच्या अनुपस्थितीत त्या प्रकारच्या जागृतीची गरज आहे का? सत्संगाची गरज आहे का?
दादाश्री : गरज तर आहेच ना! पण जमेल तेवढे करावे. जेवढे जमेल तेवढे, तर तुम्हाला अधिक लाभ होईल.
प्रश्नकर्ता : आपण परदेशात जाता तेव्हा येथे पूर्ण रिकामे असते, येथे कोणी एकत्र येत नाहीत.
दादाश्री : असे तुम्हाला रिकामे वाटते, या सर्वांना रिकामे वाटत नाही. पूर्ण दिवस दादा भगवान त्यांच्या सोबतच असतात. पूर्ण दिवस, निरंतर, चोवीस तास सोबत असतात दादा भगवान. मी तिथे परदेशात असलो तरीही! जसे गोपींसाठी श्रीकृष्ण राहत होते ना, तसेच राहतात निरंतर!
तो शिष्य म्हटला जाईल तुम्हाला स्पष्टपणे समजले की नाही? स्पष्टपणे समजले तरच