________________
८०
गुरु-शिष्य
दादाश्री : गुरूकृपेमुळे तर खूप मदत मिळते. परंतु आपली तशी भावना, तसे प्रेम असायला हवे. ज्यांच्यशिवाय आपल्याला करमत नाही, चैन पडत नाही असा भाव हवा. विरह वाटला पाहिजे.
गुरूंचे ज्ञान जितके कच्चे असेल, तितका काळ त्या शिष्याला अधिक लागेल. एक्जेंकट ज्ञान लगेचच फळ देते आणि जरी मला केवळज्ञान होता-होता थांबले आहे, परंतु भेद ज्ञान तर माझ्याजवळ आहेच आणि ते लगेचच फळ देईल असे आहे.
गुरूंचे प्रेम-राजीपा प्रश्नकर्ता : गुरू प्रसन्न झाले असे कधी मानले जाईल?
दादाश्री : ते तर आम्ही संपूर्ण आज्ञेत राहू तर ते प्रसन्न होतील. ते प्रसन्न झाले तर आम्हाला कळेल. रात्रंदिवस आम्हला प्रेमातच ठेवतील.
__ प्रश्नकर्ता : असे काही खास प्रकारचे वर्तन पाहून गुरू प्रसन्न होतात, पण नंतर आमच्या वर्तनात कदाचित कधी न्यून आले तर पुन्हा नाराज पण होऊ शकतात ना?
दादाश्री : असे आहे की, प्रसन्न कोणाला म्हणतात, की कधी नाराजच होणार नाहीत. शिष्य तर चुका करतच राहणार, परंतु ते नाराज होत नाहीत.
अनोखी गुरूदक्षिणा प्रश्नकर्ता : आध्यात्मिक गुरू निःस्पृही असतील तर त्यांना गुरूदक्षिणा कशी देता येईल?
दादाश्री : त्यांची आज्ञा पालन करण्याने, त्यांची आज्ञा पाळली ना, तर त्यांना गुरूदक्षिणा पोहोचतेच. या आम्ही पाच आज्ञा देतो, त्या पाळल्या तर आमची दक्षिणा पोहोचली.
प्रश्नकर्ता : विद्यागुरू नि:स्पृही असतील तर त्यांना गुरूदक्षिणा कशा प्रकारे देता येईल?