________________
७८
गुरु-शिष्य
आहेत, त्यांचे दर्शन करण्यास जात आहे.' काही लोक तर आपल्या गुरूंना सुद्धा माझ्याजवळ घेऊन येतात, कारण गुरूनां सुद्धा मोक्ष हवाच असतो ना!
प्रश्नकर्ता : एकदा गुरू केले असतील आणि मग सोडून दिले तर काय होईल?
दादाश्री : पण गुरूंना सोडण्याची गरजच नाही. गुरूंना का सोडायचे? आणि मी कशासाठी सोडण्यास सांगेन? त्या भानगडीत मी कशाला पडू? त्यामुळे जे उलट परिणाम होतील, त्याचा गुन्हेगार मी ठरेन! आता त्या गुरूंची मनधरणी करून आपण त्यांच्याशी काम घेतले पाहिजे. असे आपण करु शकतो. आपल्याला जर या भाऊंकडून काम करवून घेता येत नसेल, जमत नसेल तर आपण त्यांच्याकडून कमी कामे घ्यावीत. पण सहज त्यांच्याकडे येणे-जाणे ठेवावे, त्यात काय हरकत काय आहे?
प्रश्नकर्ता : समजा आधी कोणी दुसरे गुरू केले असतील, नंतर आपण भेटलात, मग ते चहासारखे आणि हे जिलेबीसारखे होईल, त्याचे काय?
दादाश्री : चहा-जिलेबीसारखे होईल, ती वेगळी गोष्ट आहे. ते साहजिकच आहे. आम्ही जर असे म्हटले की, त्यांना सोडून द्या' तर ते उलट चालतील. म्हणून सोडून चालणार नाही. अगोड लागले तर अगोड पण सोडायचे नाही. त्यांना दुःख होऊ नये म्हणून कधीतरी आपण जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे. त्यांना असे वाटता कामा नये की, 'हा येत होता आणि आता येत नाही.' त्यांना जर कळले की तुम्ही आता दुसऱ्या जागी जातात, तर म्हणावे, 'आपल्या आराधनेमुळेच तर मला हा फायदा मिळाला आहे ना! आपणच या रस्त्याने मला चालायला शिकवले ना!' मग त्यांना आनंद वाटेल. आत्मसन्मुखताचा मार्ग कसा आहे? कोणी चहाचा एक कप जरी पाजला असेल ना, तर त्यालाही विसरायचे नाही. तुम्हाला हे कसे वाटते?
प्रश्नकर्ता : समजले नाही म्हणून हे विचारले.