________________
गुरु-शिष्य
दादाश्री : विद्यागुरू निःस्पृही असतील तर त्यांची सेवा करून, शारीरिक सेवा आणि दुसरी कामे करून चुकवली जाऊ शकते. दुसरे सुद्धा बरेच प्रकार असतात. निःस्पृही व्यक्तीची दुसऱ्या प्रकारेही सेवा केली जाऊ शकते.
अंतर्यामी गुरू प्रश्नकर्ता : बाह्य गुरू आणि अंतर्यामी गुरू या दोघांची उपासना एकाचवेळी केली जाऊ शकते का?
दादाश्री : हो, अंतर्यामी गुरू जर तुम्हाला मार्गदर्शन करत असतील तर मग बाह्य गुरूंची आवश्यकता नाही.
प्रश्नकर्ता : देहधारी गुरू असतील तर अधिक पुरुषार्थ होऊ शकतो.
दादाश्री : हो, प्रत्यक्ष गुरू असतील तर पुरुषार्थ लगेच होतो. अंतर्यामी तर तुम्हाला पुष्कळ मार्गदर्शन करतात. ते खूप उच्च कोटीचे समजले जाते. परंतु अंतर्यामी प्रकट होणे अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. ते तर बाहेरचे जे गुरू आहेत, ते तुम्हाला अधिक मदत करतील.
नाही तर आत तुमच्या आत्म्याला गुरू बनवा, त्यांचे नाव शुद्धात्मा. त्यांना सांगा, 'हे शुद्धात्मा भगवान, तुम्ही मला मार्गदर्शन करा.' तर ते करतील.
गुरूंची गरज कोणाला नाही? प्रश्नकर्ता : आपल्याकडून यर्थाथ समकित झाल्यानंतर गुरूंची गरज नाही ना?
दादाश्री : नंतर गुरू नकोत, गुरूंची गरज कोणाला नसते? तर माझ्यासारख्या ज्ञानीपुरुषाला गुरूंची गरज नाही. ज्यांना स्वतःचे सर्वच दोष दिसतात!
प्रश्नकर्ता : आपण ज्ञान प्रदान केलेत तर सतत जागृत राहण्यासाठी गुरूंचा सत्संग अथवा गुरूंचे सानिध्य गरजेचे आहे का?