________________
गुरु-शिष्य
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : मुळात तिथे रस्ताच उलटा आहे. तिथे! म्हणून तर क्रमिक मार्गाच्या ज्ञानींनाही चिंता आणि शिष्यानांही चिंता! निव्वळ संताप, संताप आणि संताप!! गुरूंना देखील संताप! त्या तीन शिष्यांना जर सांगितले की, 'आज तुम्ही चरणविधी कंठस्थ करून या, तुम्ही इतकी पदे (भजने) कंठस्थ करून या' तेव्हा मग एखादा शिष्य डोके खाजवतो की आता गुरूंनी सोपवले तर आहे, पण हे कसे होणार? घरी जाऊन कंठस्थ करतो, पण कंठस्थ होत नाही त्यामुळे रात्रभर मनात कुढत राहतो. वाचत जातो आणि जळफळत राहतो. चिडचिड होत असल्यामुळे गुरूविषयी अभाव निर्माण होतो की असे अवघड काम कशासाठी देतात! गुरूंनी सांगितलेले करायला आवडत नाही, मग काय होणार? अभाव होतो. हाच तर क्रमिक मार्ग. गुरू सुद्धा मनात विचार करतात की 'हे सर्व कंठस्थ केले नाही तर आज मी त्यांना खडसावेल.' आता शिष्य तिथे जातो ना, तेव्हा जाता-जाताच त्याला भीती वाटते की, 'गुरू काय म्हणतील नि काय नाही?, काय म्हणतील नि काय नाही?' अरे! मग गुरू कशासाठी केलेस? असेच राहायचे होते ना! खडसावतील याची इतकी भीती वाटत असेल तर गुरूशिवायच पडून राहायचे होते ना! नाही तर खडसावण्याचा प्रसाद घ्यायला हवा. खडसावण्याचा प्रसाद चाखायला नको का?
मग सकाळी जेव्हा ते शिष्य गुरूकडे येतात, तेव्हा त्यांच्यातला दोन शिष्यांनी गुरूंनी सांगितल्याप्रमाणे केलेले असते पण एका शिष्याला ते करता आले नसेल, तर तो गुरुंजवळ जाऊन बसतो, पण त्याच्या तोंडावरूनच साहेब ओळखतात की याने 'काहीच केलेले दिसत नाही' त्याच्या तोंडावरुनच कळते. म्हणून साहेब मनातल्या मनातच चिडत राहतात की, 'हा काहीच करत नाही, काहीच करत नाही' शिष्याने कंठस्थ केलेले नसते म्हणून त्याला ओरडतात! गुरूंचे डोळे रागाने लाल झालेले असतात, डोळे अगदी लालच असतात. हा शिष्य काही करेल असा नाही, म्हणून गुरू सारखे चिडत राहतात आणि तो शिष्य घाबरत राहतो. आता याचा मेळ कसा बसेल? म्हणून तिथे फक्त तीनच शिष्य की, जे त्यांच्या मागे