________________
गुरु-शिष्य
दादाश्री : प्रकृतीचा दोष नाही. गुरू तर आपली प्रकृती कशीही असो पण अंगावर घेतात. हे तर असेच गुरू बनून बसले आहेत. लोक तर कुठल्याही दुकानात बसून गयावया करतात. ते असे पाहत नाहीत की क्रोध-मान-माया-लोभ कमी झाले आहेत की नाही? मग याचा काय फायदा? परंतु आपल्या लोकांची हीच वाईट सवय आहे. ज्याच्या दुकानात बस्तान बसवले मग तिथे हे पाहत नाहीत की यांचे क्रोध-मान-माया-लोभ गेले? उणीवा गेल्या? मतभेद कमी झाले? चिंता कमी झाली? संताप कमी झाला? आधी-व्याधी-उपाधी कमी झाली? तर म्हणे, 'काहीच कमी झालेले नाही.' अरे, मग सोड ना, या दुकानातून निघून जा ना, इतकेही समजत नाही? ___ही तर सगळी गुरूंचीच चूक आहे. कुठलेही गुरू (सोडण्यासाठी) हो म्हणत नाही. मी तर खरी गोष्ट सांगण्यासाठी आलो आहे. माझा कुणाबरोबर भेद नाही किंवा कुणाबरोबर काही भानगड नाही! बाकी, कोणी गुरू हो म्हणणार नाही. कारण त्यांची ध्वजा ठीक नाही. गुरू बनून बसलेत, लोकांच्या डोक्यावर चढून बसलेत!
क्लेश संपवतील, ते खरे गुरू गुरू तर तेच की आपल्याला अशी समज देतात की ज्यामुळे क्लेश होणार नाही. महिनाभरात कधीही क्लेश होणार नाही, अशा त-हेने समजावतील, त्यांना गुरू म्हणता येईल. आपल्याला क्लेश होत असेल तर समजावे की गुरू मिळाले नाहीत. कढापा-अजंपा (बैचेनी, अशांती, क्लेश) होत असेल तर गुरू करण्यात काय अर्थ? गुरूंना आपण सांगितले पाहिजे की, 'साहेब, तुमचा कढापा-अजंपा गेलेला वाटत नाही, नाही तर माझा कढापा-अजंपा का जाणार नाही? माझा जाईल असे असेल तरच मी आपल्याकडे पुन्हा येईल.' नाही तर 'राम राम, जय सच्चिदानंद' म्हणावे! अशी दुकाने फिरून-फिरून तर आतापर्यंत अनंत जन्म भटकलो! आणि काही होत नसेल तर गुरूंना सांगावे की 'साहेब, 'तुम्ही खूप महान आहात, पण आमच्यात काहीच बदल होत नाही म्हणून जर काही उपाय असेल तर करून बघा, नाही तर आम्ही