________________
७४
गुरु-शिष्य
तर मग आता दुकान (गुरू) बदला. कुठपर्यंत एकाच दुकानात पडून राहणार? तुम्हाला पडून राहायचे असेल तर पडून राहा, बाकी मी तर तुम्हाला हा सल्ला देतो. तुमचे काम झाले असेल तर तिथे राहण्यास हरकत नाही. त्या एकाच जागी राहिले तर दुसऱ्या जागी लुडबुड करण्याची आवश्यकता नाही. ___ मतभेद होत असतील तर मग गुरूदेवांनी काय केले? गुरूदेव ते की जे सर्व दु:खं टाळतात.
प्रश्नकर्ता : त्या गुरूंची गोष्ट ठीक आहे. पण हे तर मी माझ्या अंत:स्फुरणेने गुरूंचा स्वीकार केला होता.
दादाश्री : ते ठीक आहे. त्यात काही हरकत नाही. पण आपण बारा वर्षांपर्यंत औषध घेतले आणि आतला रोग बरा झाला नाही तर जळो ते डॉक्टर! आणि जळो ते औषध! ठेव ते त्यांच्या घरी? अनंत जन्मात हेच केले, आणि भटकतच राहिलो!
प्रश्नकर्ता : परंतु त्यात गुरूदेवांची चूक काढायची की माझी स्वतःची चूक?
दादाश्री : गुरूंची चूक! आता माझ्याजवळ साठ हजार लोक आहेत पण त्यांच्यापैकी कोणास दुःख असेल तर ती माझीच चूक. त्या बिचाऱ्यांची काय चूक? ते तर दुःखी आहेत म्हणून तर माझ्याजवळ आले आहेत. तेव्हा ते जर सुखी झाले नाहीत तर ती माझीच चूक.
हे तर गुरूदेवांनी जबरदस्तीने डोक्यात ठसवले होते, कारण की ते स्वतः कोणाला सुखी करू शकत नाहीत, म्हणून म्हणतात, 'तुम्हीच वाकडे आहात म्हणून असे होत आहे.' वकील आपल्या अशिलास काय म्हणतात की, 'तुझे कर्म फुटके आहे, म्हणून असे उलटे झाले.' ___नाही तर गुरू कसे असले पाहिजेत? की जे आपली सर्व दुःखं दूर करतील! बाकीच्यांना गुरू कसे म्हणावे?
प्रश्नकर्ता : पण मला माझ्या प्रकृतीचा दोष वाटतो आहे.