________________
७२
गुरु-शिष्य
आता तिथे जात नाही. कारण ही मासळी जर एकदा पकडल्यानंतर सुटली तर पुन्हा जाळ्यात सापडते का? जो लोभी-लालची असेल त्याला गुरू करू नये. लालची नसेल, स्वतंत्र असेल त्याला गुरू करावे. गुरू म्हणतील, 'चालते व्हा' तेव्हा म्हणावे 'साहेब, जशी तुमची मर्जी. आमचे घर आहेच, नाही तर माझी बायको सुद्धा माझी गुरूच आहे !'
नाही तर बायकोला ही गुरू बनवू शकता गुरू करणे जमत नसेल आणि गुरूंशिवाय चैन पडत नसेल तर बायकोला सांगा, तू उलटी फिरुन बस. मी तुझा गुरू म्हणून स्वीकार करेन. तोंडाकडे पाहू नकोस, हं! वळून बस म्हणायचे! जिवंत मूर्ती आहे ना!
हो, म्हणजे बाकोलाच गुरू बनवा. तुम्ही काय कराल? लग्न केले नाही का अजून?
प्रश्नकर्ता : लग्न केले आहे ना!
दादाश्री : मग तिला गुरू बनवा. ती तर आपल्या घरातलीच आहे ना. तूप सांडले तरी खिचडीमध्येच राहिल ना!
प्रश्नकर्ता : त्यामुळे काय फायदा? ज्ञानी हवे ना?
दादाश्री : तर आता बाहेरचे गुरू सुद्धा काय देणार आहेत? बाकी, बायकोला तर सगळ्यांनीच गुरू बनवलेलेच असते. कोणी तोंडानी स्पष्ट बोलत नाही एवढेच.
प्रश्नकर्ता : पण सगळ्यांसमोर असे बोलू शकत नाही ना!
दादाश्री : बोलत नाहीत, पण मी जाणतो सगळ्यांना. मी म्हणतो सुद्धा की अजून 'गुरू' आले नाहीत तोपर्यंत हा शहाणा दिसतो, पण तिला येऊ तर द्या! आणि त्यात काही हरकतही नाही. पण आपली अक्कल अशी असायला हवी की तिचा फायदा करुन घ्यायचा नाही. आपल्यासाठी भजी बनवते, जिलेबी बनवते, लाडू बनवते मग तिला गुरू बनवायला काय हरकत आहे? बाहेरच्या गुरूसाठी उल्हास येत नसेल तर बायकोलाच