________________
गुरु-शिष्य
दादाश्री : गुरूंनी जरी काहीही केले, तरी पण आपल्या हातून चूक होता कामा नये. आपल्या चुकीमुळे कर्मे आपल्यालाच भोवतात व त्यांनी केलेले चुकीचे कर्म त्यांना भोवते. तुम्ही माझा अपमान केला, शिव्या दिल्या आणि जर मी रागावलो तर ते कर्म मला भोवेल. मला तसे करण्याची गरजच काय? तुम्ही तर कर्म बांधाल. तुम्ही श्रीमंत असाल, शक्तीशाली असाल तर बांधा. आमच्यात तशी शक्ती सुद्धा नाही आणि आमची तशी श्रीमंतीही नाही! तशी शक्ती असेल तर कर्म बांधू ना! तेव्हा आपण असे म्हणू नये. हा कुत्रा चावला म्हणून काय आपण सुद्धा चावायचे? तो तर चावणारच ना!
प्रश्नकर्ता : अशा गुरूंचे फोटो नदीत टाकल्याने पाप कसे काय लागेल?
दादाश्री : असे बोलायचे नसते. आपण असे बोलू नये. त्या गुरुंमध्ये भगवंताचा वास आहे. ते गुरू भले वाईट असतील, पण त्यांच्यात भगवंत विराजमान आहेत ना! आपण त्यांना निर्दोषच पाहायला हवे. पूर्व जन्माचे कोणते तरी पाप असेल म्हणून आपण फसलो आणि असे गुरू भेटले, नाही तर भेटलेच नसते ना! मागच्या जन्माचा ऋणानुबंध म्हणूनच ते भेटले ना! नाही तर कसे भेटतील? दुसऱ्या कोणाला नाही आणि आपल्याच वाट्याला का आले?
नंतर त्यासाठी आम्ही विधी केला आणि त्याला सांगितले की, 'गुरूंच्या नावाने वाईट बोलू नकोस, त्यांच्याविषयी वाईट विचार करू नकोस. गुरूंसाठी वैरभावना ठेवू नकोस.' त्याच्याकडून मनापासून प्रतिक्रमण करवून घेतले, हे सगळे शिकवले. त्या व्यक्तीला योग्य रस्ता दाखवला आणि नदीत फोटो टाकला, त्याचा कशा त-हेने विधी करावा तेही मी त्याला सांगितले. नंतर त्याचे मार्गी लागले.
मग तो वर्षभर गुरूकडे गेलाच नाही, तेव्हा गुरूंना समजले की कुणीतरी त्याला आमच्यापासून वेगळे केले आहे. वर्षभरानंतर गुरूंनी पत्र पाठवले की, 'तुम्ही या, तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही.' ही जी पीट खाण्याची सवय आहे, लोभ-लालूच आहे तीच त्याला मारते! परंतु तो