________________
गुरु-शिष्य
प्रश्नकर्ता : सध्या काही गुरू आहेत, जे फक्त नावापुरते गुरू आहेत पण ते प्रत्यक्षात लोकांचे शोषणच करत असतात.
दादाश्री : आणि एखाद-दोन गुरू खरे असतील, सरळ असतील, पण त्यांच्यात योग्यता नसते. आणि ढोंगी गुरू तर खूप हुशार असतात आणि तहेत-हेचे दिखावे करतात.
प्रश्नकर्ता : कोणताही मनुष्य मुक्त होण्यासाठी गुरूंचा आश्रय घेतो, पण त्या गुरूंच्या कचाट्यातून मुक्त होऊ शकत नाही. म्हणून गुरूपासून सुद्धा मुक्त होण्याची गरज असते, असे नाही का वाटत?
दादाश्री : हो, मला सुरत शहरात एक शेठ भेटले होते, ते मला म्हणू लागले, 'साहेब, मला वाचवा.' मी म्हटले, 'काय आहे ? तुझे काही नुकसान झाले आहे का?' तेव्हा ते म्हणाले 'माझ्या गुरूंनी असे सांगितले आहे की 'मी तुझा सत्यानाश करीन.' त्यांनी खरोखर असे केले तर? माझे काय होईल? मग मी त्याला विचारले, 'त्यांच्याबरोबर तुझा असा काही व्यवहार झाला आहे का की ते इतके कठोर शब्द तुम्हाला बोलले? त्यांच्याशी काही देण्याघेण्याचा व्यवहार आहे? असे काही असेल, तर सांग ना?' तेव्हा त्यांनी सांगितले, 'माझे गुरू म्हणतात की, 'पन्नास हजार रुपये पाठवून दे, नाही तर मी तुझा सत्यानाश करीन' अरे, त्यांच्याशी तू पैशांचा व्यवहार केलास? तू उधार घेतलेस? त्यावर तो म्हणाला, 'नाही, उधार नाही पण ते जेव्हा जेव्हा म्हणतील की पंचवीस हजार दे, नाही तर तुझे सर्व बिघडेल, ते मग तुझे तुलाच माहीत, म्हणून मी घाबरून त्यांना पैसे देत होतो. आजपर्यंत सव्वा लाख रुपये देऊन झालेत. आता आणखी पन्नास हजार रुपये माझ्याजवळ नाहीत, मग मी कुठून आणू? म्हणून आता त्यांनी निरोप पाठवला आहे की तुला पूर्ण उध्वस्त करून टाकीन.'
तेव्हा मी सांगितले, 'भाऊ, चल, आम्ही तुला रक्षण देऊ. तू बरबाद होणार नाहीस. तुझे गुरू जे काही करतील, त्यासाठी आम्ही तुझे सहाय्यक बनू, तुला बरबाद होऊ देणार नाही. पण आता तिथे काहीही पाठवू नकोस. प्रेम वाटले, उत्साह वाटला तर पाठव. पण भीतीपोटी पाठवू नकोस. नाही