________________
६८
गुरु-शिष्य
म्हणजे गुरूंचे मत असे असते की आपण दहा टक्के आपल्याजवळ अनामत ठेवावे आणि बाकीचे द्यावे. त्यांच्याकडे सत्तर टक्के असेल, त्यापैकी १० टक्के अनामत ठेवतात. जेव्हा की माझ्याजवळ पंच्याण्णव टक्के आहे, ते सगळेच तुम्हाला देतो. तुम्हाला पचले तर पचले नाही तर जुलाब होतील. पण काही तरी फायदा तर होणारच ना !
म्हणून सध्या असे गुरू घुसले आहेत की जे डबीत थोडेसे ठेवून मग बाकीचे देतात. शिष्य समजतात की, 'अजूनपर्यंत आम्हाला मिळत नाही, पण हळूहळू मिळेल.' मग गुरू हळूहळू देतात. पण आत्ताच सर्व देऊन टाक ना की ज्यामुळे त्याचे मार्गी लागेल. कोणी देतच नाही ना ! लालची लोक देतील का ? ज्यांना संसाराची लालूच आहे तो मनुष्य जितका जाणत असतो तितके पुरेपूरे ज्ञान सरळ-सरळ देऊ शकत नाही. लालचीपणामुळे स्वतः जवळ ठेवतो.
प्रश्नकर्ता : पण त्यांना शिष्य भेटला आहे तो देखील लालचीच भेटला आहे ना! त्याला सर्व काही मिळवून घ्यायचे आहे ना ?
दादाश्री : शिष्य तर लालचीच आहे. माझे म्हणणे आहे की शिष्य तर लालचीच असतो. त्या बिचाऱ्याची इच्छा तर आहे की, 'मला हे ज्ञान मिळाले तर बरे.' तशी लालूच असतेच. पण हे गुरू सुद्धा लालची ? ते कसे परवडेल? म्हणून स्वतः एडव्हान्स होत नाहीत, स्वतः प्रगती करत नाहीत आणि शिष्यांना सुद्धा संकटात टाकतात. तर आता हे सर्व असे झाले आहे या हिंदुस्तानात.
आणि असे मार्गी लावले
गुरू चांगले असतील तर दुसरी कुठली झंझट होत नसते. या काळात खरे गुरू मिळणे, व्यापारी (मनोवृत्ती) नसतील अशा गुरूंची भेट होणे, हे खूप मोठे पुण्य समजले जाते. नाही तर गुरू काय करतात ? शिष्याकडून शिष्याचा उणेपणा काढून घेतात आणि मग त्या उणेपणाचाच लगाम पकडतात आणि जीव नकोसा करतात. तो बिचारा स्वतःचा उणेपणा गुरूंना नाही सांगणार तर कोणाला सांगणार ?