________________
६६
गुरु-शिष्य
भगवंताच्या वेळी कोणी असे म्हणत नव्हते की, 'एवढे करावे लागेल.' परंतु हे सगळे तर म्हणतील, 'एवढे तर करावेच लागेल' मग शिष्य काय म्हणतील? 'साहेब, काही होत नाही, काहीच होत नाही' अरे, मग तर दगड बनशील. कारण जसे चिंतन करु तसे घडून येते. 'काहीच होत नाही' असे चिंतन केले तर असेच घडेल की नाही? लोकांना हे समजत नाही म्हणून सगळा घोटाळा चालतो. नेहमी, जे गुरू करुन देत नाहीत, ते गुरू म्हणजे डोक्यावरचे ओझे. तुम्हाला डॉक्टरांना असे नाही का सांगावे लागणार की, 'मला कुठला तरी आजार आहे, पण ते मला माहीत नाही. आपणहूनच काही तरी झाले आहे. तुम्ही मला या आजारातून मुक्त करा.'
प्रश्नकर्ता : हो, सांगावे लागते.
दादाश्री : म्हणजे गुरूंनीच करून दिले पाहिजे. सगळे तेच शिकवतात. मग वाचायला सांगतात की, 'एवढे वाचून या.' पण सगळे काही तेच शिकवतात. हे तर बायका-मुले असलेले, नोकरी करणारे लोक ते बिचारे केव्हा करतील? जेव्हा की गुरुंमध्ये तर खूप शक्ती असते, अपार शक्ती असते, ते सर्वच करून देतात. गुरूंनी असे सांगितले पाहिजे की, 'तुला समजत नाही, पण मी आहे ना तुझ्या पाठीशी! मी आहेच ना! तू घाबरू नकोस.' 'तुला समजत नसेल तर तू माझ्याकडून सर्व घेऊन जा.' आणि मी सुद्धा या सगळ्यांना सांगितले आहे की, 'तुम्हाला काहीच करायचे नाही. मला करायचे आहे. तुमच्यात जी कमतरता असेल ती सर्व मला काढायची.
दादांनी लुटवले गहन ज्ञान मी तर काय म्हणतो की तुम्ही सगळे माझ्याबरोबर चला, तर म्हणतात, 'नाही, तुम्ही एक पाऊल पुढे.' तेव्हा मी म्हणतो की एक पाऊल पुढे पण तुम्ही माझ्याबरोबर चला. मी तुम्हाला शिष्य बनवू इच्छित नाही. मी तुम्हाला भगवंत बनवू इच्छितो. तुम्ही आहातच भगवंत, तुमचेच पद तुम्हाला देऊ इच्छितो. मी म्हणतो की तू अगदी माझ्यासारखा हो, तू तेजस्वी हो. माझी जशी इच्छा आहे, तसा तू हो ना!