________________
६४
गुरु-शिष्य
अरे, असे स्पष्टपणे सांगून दे ना ! असे नाही का बोलू शकत ? तुम्ही का बोलत नाहीत? हे मी कोणाच्या बाजूने बोलत आहे ? कोणाच्या बाजूने बोलत आहे ?
प्रश्नकर्ता : आमच्या बाजूनेच बोलत आहात.
दादाश्री : हो. तुम्ही असे सांगितले पाहिजे की, 'साहेब, तुम्ही तर बलवान आहात व मी निर्बळ आहे. हे तर तुम्ही जे सांगाल ते करायची माझी तयारी आहे, नाही तर माझे सामर्थ्यच नाही, म्हणून तुम्हीच करुन द्या आणि जर करणार नसाल तर मी दुसऱ्या दुकानात जाईल. तुमच्यात बरकत असेल तर सांगा आणि बरकत नसेल तर तसे सांगा, मी दुसऱ्या दुकानात जाईन. तुमच्याकडून असंभव असेल तर मी दुसऱ्या जागी जाईन, दुसरे गुरू करेन.
अर्थात गुरू कोणास म्हणावे ? तर काही करायला सांगत नाहीत, ते म्हणजे गुरू! हे तर असेच गुरू बनून बसलेत. वर सांगतात, ‘पंगुम् लंघयते गिरीम्'. अरे, असे म्हणतात. पण तुम्ही तर आम्हालाच सांगता की, 'तू चाल.' तुम्हीच तर मला सांगता की, 'मला तुझ्या खांद्यावर बसव' गुरू काय म्हणतात? की 'मला तुझ्या खांद्यावर बसव. ' अरे, मी पंगू आणि तुम्ही माझ्या खांद्यावर बसायचे म्हणता ? हा विरोधाभासच नाही का म्हटला जाईल ? तुम्हाला काय वाटते ?
प्रश्नकर्ता : याचा अर्थ असा झाला की शिष्याने कुठलीच मेहनत करायची नाही, सगळी मेहनत गुरूंनीच करायची ?
दादाश्री : हो, गुरूंनाच करायची. तुम्हाला जर महेनत करावी लागत असेल तर तुम्ही त्यांना विचारले पाहिजे की, 'साहेब, मग तुम्ही काय करणार आहात? ते सांगा. जर तुम्हाला काहीच करायचे नसेल आणि असा हुकूमच करायचा असेल तर त्यापेक्षा मी माझ्या घरी बायकोचा हुकूम मानेल, बायको सुद्धा पुस्तकात बघून सांगेल. तुम्ही सुद्धा पुस्तकात बघून, शास्त्र बघूनच सांगता. तेव्हा ती सुद्धा पुस्तकात बघून सांगेल. तेव्हा
4
असे करा ' सांगून चालणार नाही. तुम्ही काही तरी करू लागा. माझ्याकडून होत नाही, ते तुम्ही करा आणि तुमच्याकडून होत नाही ते आम्ही करू.