________________
गुरु-शिष्य
अशी वाटणी करून घ्या.' त्यावर ते गुरू काय म्हणतात? 'आम्ही कशासाठी करू?' तेव्हा आपण म्हणायचे, 'मग तुमच्याकडे माझे काही भलं होणार नाही शुक्रवार बदलणार नाही आणि माझा शनिवार येणार नाही.' असे आपण सांगितले पाहिजे ना?
प्रश्नकर्ता : पण समोरची व्यक्तीच बरोबर नसेल तर काय?
दादाश्री : समोरच्या व्यक्तीला पाहण्याची गरज नाही. गुरू चांगले असले पाहिजेत. समोरची व्यक्ती तर तशीच आहे. समर्थ नाहीच बिचारा. तो तर असेच म्हणतो ना की, 'साहेब, मी समर्थ नाही, म्हणून आपल्याजवळ आलो आहे. आणि मी करायचे असते का? मग ते म्हणतील, 'नाही, तुला करावे लागेल.' तर मग ते गुरूच नाहीत. जर मला करावे लागत असेल तर तुम्हाला शरण कशासाठी येऊ? तुमच्यासारख्या समर्थास कशासाठी शोधून काढले? जरा इतका विचार तर करा! तुम्ही समर्थ आहात आणि मी तर निर्बळ आहे. माझ्याने होत नाही म्हणून तर तुम्हाला शरण आलो, आणि माझ्यात जर कर्तेपण राहणार असेल मग तुम्ही कसे आहात? तुम्हीही निर्बळच म्हटले जाणार ना! तुम्हाला समर्थ कसे म्हणता येईल? कारण समर्थ तर सर्व काही करू शकतात.
ही तर गुरुंमध्ये बरकतच नाही, म्हणूनच समोरच्या व्यक्तीला ओझे वाटते. गुरुंमध्ये बरकत नाही म्हणून समोरच्या व्यक्तीचा दोष काढतात. पतीमध्ये बरकत नसेल तर पत्नीचा दोष काढतो. निर्बळ पती बायकोवर शूरता दाखवतो, अशी म्हण आहे. तसेच हे गुरू सुद्धा निर्बळ आहेत ना, म्हणून शिष्यावर जोर दाखवतात शिष्याला छळतात की, 'तुमच्याकडून काही होत नाही.' मग मोठे गुरू होऊन येथे का बसलात? अरे, काही कारण नसताना शिष्यांना का ओरडता? बिचारे ते दु:खी आहेत म्हणून तर तुमच्याजवळ आले आहेत. आणि वर तुम्ही ओरडता. घरी पत्नी ओरडते आणि येथे तुम्ही ओरडता, तर याचा कधी पार येईल?
गुरू तर ते की जे शिष्याला ओरडत नाहीत, शिष्याचे रक्षण करतात, शिष्याला आसरा देतात. या कलियुगातील गुरूंना गुरू म्हणायचेच कसे? दिवसभर शिष्याला त्रास देत राहतात. हा योग्य रस्ताच नाही ना!