________________
गुरु-शिष्य
६३
आपल्या लक्षात आले नाही? मी तुम्हाला सांगेन की, 'हे तुम्ही सोडून द्या' आणि तुमच्याकडून ते सुटले नाही म्हणजे समजावे की माझ्यात दोष आहे. तुमच्याकडून सुटले नाही तर तुम्ही माझ्यात दोष काढला पाहिजे. तुम्ही सर्व प्रयत्न करून सुद्धा सुटत नसेल, तर त्याचे कारण काय? तर माझ्यात दोष आहे म्हणूनच! हो, याचे कारण हे की सांगणाऱ्यात दोष असलाच पाहिजे!!
'तुम्ही असे करा, हे करा' असे कोणी वचनबळ असलेला बोलेल तर चालेल. येथे तर वचनबळच नाही, म्हणून शिष्याची गाडी पुढे चालतच नाही. ही एक प्रकारची सांगण्याची वाईट सवयच झालेली असते.
ती समर्थताच सर्व सांभाळते । आणि सगळीकडे नियम असाच असला पाहिजे की गुरूंनीच करुन द्यायला हवे. गुरुंजवळ लोक कशासाठी जातात? हे तर गुरूंकडून होत नाही म्हणून गुरूंनी शिष्याच्या डोक्यावर लादले की, 'तुम्ही काही करा, तुम्ही करत नाही, तुम्ही करत नाही.' म्हणून मग आपल्या लोकांनीही असे मानून घेतले. गुरू ठपका देतात आणि लोक ऐकून सुद्धा घेतात! अरे, अशी दुषणे ऐकून घ्यायची नसतात. पण हे गुरू खाऊन-पिऊन पाठी लागतात. शिष्यांना ओरडतच राहतात की, 'तुम्ही काही करत नाही, तुम्ही हे करत नाही, आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही असे करून आणा.'
साधकाची दशा तर निर्बळच असते. सगळेच साधक काही असे मजबूत नसतात. आता निर्बळ व्यक्ती तर दुसरे काय दाखवणार? निर्बळताच दाखवणार. तुम्ही तर असेच सांगायचे की, 'साहेब, तुम्हाला आम्ही जसे हवे आहोत तसे तुम्हीच आम्हाला बनवून टाका. तुम्ही तर इतक्या मोठ्या गुरूपदावर बसले आहात आणि मला करून आणायला सांगता? पण मी तर अपंग आहे, मी तर पंगू आहे, तुम्हीच मला उभे करायचे आहे. तुम्ही मला खांद्यावर उचलायचे असते की मी तुम्हाला खांद्यावर उचलायचे? असे गुरुंशी आपण असे बोललो पाहिजे ना? परंतु आपल्या देशातील लोक इतक्या नरम स्वभावाचे आहेत म्हणून गुरूने काही सांगितले तर म्हणतील की, 'हो साहेब, उद्या करून आणतो.'