________________
गुरु-शिष्य
६७
मी स्वत:जवळ काहीच ठेवले नाही, सगळे काही तुम्हाला देऊन टाकले आहे. मी काही सुद्धा खिशात ठेवलेले नाही. जे होते ते सगळेच दिले आहे, सर्वस्व देऊन टाकले आहे! पूर्ण दशेपर्यंतचे दिले आहे. आणि आम्हाला तुमच्याकडून काहीच नको. आम्ही देण्यासाठी आलो आहोत, आमचे सगळे ज्ञान देण्यासाठी आलो आहोत. म्हणून तर हे सगळे उघड केले. म्हणून लिहिले आहे ना, 'दादाच भोळे आहेत, लुटवले आहे गहन ज्ञान.'
ज्ञान कोणी लुटवतच नाही ना! अरे, ते लुटवु द्या ना! तरच लोकांना शांती लाभेल, समाधान होईल. माझ्याजवळ ठेवून मी काय करू? त्याला दाबून त्यावर झोपू?
___आणि नियम असा आहे की या दुनियेत प्रत्येक वस्तू जी दिली जाते, ती कमी होते, आणि फक्त ज्ञानच दिल्याने वाढते. असा स्वभावच आहे. फक्त ज्ञानच! दुसरे काहीच नाही. दुसरे सगळे तर कमी होते. मला एक व्यक्ती म्हणाली की, 'तुम्ही जेवढे जाणत आहात ते सर्व का सांगून टाकता? थोडेसे डबीत ठेवत नाही?' मी म्हटले, 'अरे, देण्यामुळे तर माझे वाढते! माझेही वाढते आणि त्याचेही वाढत जाते, तर त्यात माझे काय नुकसान आहे? मला ज्ञान डबीत ठेवून गुरू बनून बसायचे नाही की तो माझे पाय चेपत राहिल. ती मग इंग्रजांसारखी परिस्थिती होईल, त्यांनी सर्व ज्ञान डबीत ठेवले होते. 'know-how' (माहिती) चे सुद्धा त्या लोकांनी पैसे घेतले. मग तर हे सगळे ज्ञान पाण्यात बुडून जाईल. आणि आपले लोक देतच राहायचे. मोकळ्या हातांनी देत असत. आयुर्वेदाचे ज्ञान देत असत, मग दुसरे ज्योतिषविद्येचे ज्ञान देत असत, अध्यात्मज्ञान देत असत, सर्व मोकळ्या हातांनी देत असत.
__ आणि हे काही लपवून ठेवलेले ज्ञान नाही. येथे व्यवहारात तर गुरू थोडेसे गाठीला बांधून ठेवतात. म्हणतील, 'शिष्यात वाकडेपणा आहे, तो डोक्यावर चढून बसेल. त्याने विरोध केला तर आपण काय करणार?' कारण त्या गुरूंना व्यवहाराचे सुख हवे असते. खाण्या-पिण्याचे, वगैरे सगळे काही हवे असते. पाय दुखत असतील तर शिष्य पाय चेपून देतात. तो शिष्य जर त्यांच्यासारखाच झाला तर मग तो पाय चेपणार नाही, मग काय होईल? म्हणून ते थोड्या चाव्या स्वत:जवळ ठेवतात.