________________
१०
गुरु-शिष्य
तर ते अधिकच उसळतील. तू घाबरू नकोस. तुझ्या गुरूंच्या विरुद्ध चिंतन करू नकोस. कारण तुझ्या चुकीमुळे गुरूंनी पैसे घेतले आहेत, त्यांच्या चुकीमुळे घतलेले नाही.
त्याच्याच चुकीमुळे पैसे घेतले ना! त्याला काही लालूच असेल तेव्हाच ना! काही लालूच असेल तेव्हाच त्याने हे गुरू केले होते ना! आणि तेव्हाच त्याने पैसे दिले ना! म्हणजे लालचीपणामुळेच फसले गेले. आणि हे लोक हातात आलेले सोडत नाही. दुषमकाळातील लोक, त्यांना स्वतःची अधोगती होईल किंवा काय होईल, याची पर्वाच नसते. शिकार हातात यायला हवी. पण ते तर काय म्हणतात 'आमचे भक्त आहेत' असे म्हणतात ना? 'शिकार' म्हणत नाहीत, तेवढे बरे आहे आणि ते शिकारी लोक तर 'शिकार' म्हणतात.
मग मी त्याला विचारले, 'तू गुरूंच्या नावाने काही केले का?' त्याने सांगितले, 'हो, त्यांच्या फोटोची मी पूजा करीत होतो, तो मग तापी नदीत टाकून आलो.' त्यांनी मला खूप त्रास दिला, म्हणून मला खूप राग आला! म्हणून टाकून दिला. अरे, पण फोटोची पूजा कशाला केलीस? आणि पुजले होतेस तर मग तापीमध्ये का टाकलेस? गुरूंनी तुला असे सांगितले नव्हते की तू पूजा करून तापीमध्ये टाकून ये. नाही तर आधी पूजाच करायची नव्हती. पूजा केलीस म्हणून जबाबदारी तुझी आहे. हे तर तू चुकीचे केलेस. कालपर्यंत भक्ती करीत होतास आणि आज पाण्यात टाकलास! भक्ती करणारा तू आणि उपटून टाकणारा सुद्धा तूच. स्वतःच भक्ती करणारा आणि स्वतःच उपटून टाकणारा! हा गुन्हा आहे की नाही? मग भक्ती कशासाठी केलीस? आणि जर उपटायचे असेल तर विधिपूर्वक उपटून टाकावे. असे चालणार नाही. कारण ज्या फोटोची आजपर्यंत पूजा करत होतास, त्यास उद्या नदीत विसर्जन करणे, ही तर हिंसा म्हटली जाईल. आपण जाणतो की हा भगवंताचा फोटो आहे तरी पण त्याला पाण्यात बुडवणे ही आपली चूक आहे. जाणत नसू आणि अजाणतेपणी केले असेल तर हरकत नाही.
प्रश्नकर्ता : गुरूंनी असे केले म्हणून तर त्याला टाकून द्यावे लागेल ना? गुरू निमित्त बनलेच ना त्यात? ते दोषी ठरले ना?