________________
गुरु-शिष्य
लागलेले असतात. तेवढ्याच शिष्यांना ते पोषण देऊ शकतात. बाकीचे सगळे तर दर्शन करून निघून जातात.
क्रमिक मार्गात शेवटपर्यंत बेचैनी जात नाही. गुरू आणि शिष्य, दोघांनाही बैचैनी! पण ही बैचैनी म्हणजे तप आहे. म्हणून तोंडावर तेज येते. कारण जसे भेसळयुक्त सोन्याला तापवले तरच त्यात थोडी-थोडी सुधारणा होते ना! खरे सोने लखलखू लागते ना!
भेद, गुरूशिष्यामध्ये... प्रश्नकर्ता : सामान्यतः बाहेर गुरू-शिष्य यांच्यात अंतर राहते ना, की मग ते एकरूपच राहतात?
दादाश्री : एकरूप झालेत की मग तर त्या दोघांचेही कल्याण होईल. पण हे तर शिष्याकडून काचेचा पेला फुटला तर गुरू चिडल्याशिवाय राहतच नाहीत. नाही तर गुरू-शिष्य जर पुण्यवान असतील आणि दोघेही एकरूप बनून राहिले तर दोघांचेही कल्याण होईल. पण असे घडत नाही. अरे, क्षणभरासाठीही स्वतःचा स्वतःवरच विश्वास बसत नाही, असे हे जग आहे, मग शिष्यांवर कसा विश्वास बसेल? शिष्याने जर कधी दोन पेले फोडले तर गुरू रागाच्या भराने डोळे वटारतात.
अर्थात नुसत्या अडचणीच, दिवसभर अडचणी! आणि गुरूंना सांगत सुद्धा नाहीत की, 'साहेब माझ्या अडचणी तुम्ही पदरी घ्या.' आणि हो, गुरूंना तुम्ही असेही विचारू शकता की, 'साहेब, आपण इतके महान असून देखील इतके का चिडता?
__ प्रश्नकर्ता : परंतु गुरूंना आम्ही असे कसे विचारु शकतो? आम्ही तर असे विचारु शकत नाही ना?
दादाश्री : गुरूंना विचारु शकत नसाल, मग ते गुरू काय कामाचे! शिष्यांशी मतभेद होत असेल, तेव्हा आपल्याला हे नाही कळत की यांचे तर शिष्यांशी मतभेद होतात, मग तुम्ही कसले गुरू? जर एका शिष्याबरोबरही सरळ राहू शकत नाहीत, मग तुम्ही संपूर्ण जगाशी सरळ कसे राहाल? तसे तर तुम्ही सगळ्यांना सल्ला देता की, 'भाऊ, भांडण