________________
गुरु-शिष्य
किंवा तीनच शिष्य असतात, अधिक नसतात. खरे शिष्य की जे गुरूंच्या पदचिन्हांवरून चालणारे असतात, असे शिष्य दोन किंवा तीन असतात. असे आपल्या शास्त्रात विवेचन केले आहे. तो मार्ग तर खूप कठीण असतो ना! तिथे सांगतील, 'तुझे जेवणाचे ताट दुसऱ्याला द्यावे लागेल' तेव्हा म्हणे, 'नाही साहेब, मला हे जमणार नाही, मग तर मी माझ्या घरीच निघून जाईल.' कोण थांबणार तिथे ! म्हणून शास्त्रकारांनी म्हटले आहे की क्रमिक मार्गातल्या प्रत्येक ज्ञानींच्या मागे दोन - चार शिष्यच झालेत, त्याहून अधिक नाही.
५५
प्रश्नकर्ता : शिष्यांमध्ये इतके चारित्र्यबळ नसते का ?
दादाश्री : हो, ते बळ कुठून आणतील ? यांचे सामर्थ्यच किती असेल ? सगळ्यांना जेवण वाढत असाल आणि त्याला श्रीखंड वाढले नाही, तर तो चिडत राहतो. अरे, एका दिवसापुरतेच, एकदाच जरी असे घडले तरी एवढी चिडचिड करतोस ? पण तो चिडतच राहतो! अरे, त्याला दुसऱ्यांपेक्षा कमी श्रीखंड वाढले असेल तरीही चिडचिड करतो ! मग असे लोक चारित्र्यबळ आणणार तरी कुठून ?
आणि मी जर एखाद्या दिवशी सगळ्यांना असे सांगितले की, 'तुम्हाला आवडणारे पदार्थ वाढले गेले तर तुम्ही त्यातले थोडेसे चाखून लगेच दुसऱ्यांना देऊन टाका आणि तुम्हाला नावडते पदार्थ स्वतः त:साठी ठेवा' तर काय होईल ?
प्रश्नकर्ता : सगळे निघून जातील.
दादाश्री : हो, निघूनच जातील. 'बरं, आम्ही निघतो दादा, ' म्हणतील! नंतर दुरुनच नमस्कार करतील !!
या क्रमिक मार्गात गुरूंचे कसे असते ? तर हा जो आम्ही व्यवहार करत आहोत तोच खरा आहे आणि त्याचे कर्ते आम्ही आहोत. म्हणून याचा त्याग आम्ही करायला हवा. असा व्यवहार असतो. एकीकडे व्यवहार भ्रांतीपूर्ण आणि दुसरीकडे 'ज्ञान' शोधतात, तर ते सापडेल का ? आपल्याला काय वाटते? सापडेल ?