________________
गुरु-शिष्य
उतरावे लागते. परंतु गुरूच्या कृपेमुळे त्याला आत कसलीही उपाधी वाटत नाही आणि परत त्या गुरूचे स्वतःच्या गुरूच्या कृपेने चालत असते. म्हणजे या गोष्टींचा कधी अंतच येत नाही, आणि अशीच गाडी चालत राहते. सगळे गुरू साफ करतात. एक गुरू जर केले असतील, तर ते गुरू तुमचा सर्व मळ (अशुद्धी) साफ करतात. आणि त्यांचा जो मळ असेल, तो तुमच्यात घालतात. नंतर दुसरे गुरू भेटतात, ते परत तुमच्यात जो मळ असेल तो साफ करतात आणि त्यांचा मळ तुमच्यात घालतात. ही आहे गुरू परंपरा!
जसे की कपडे धुण्यासाठी आपण साबण घालतो, तो साबण काय करतो? कपड्याचा मळ काढतो. परंतु साबण स्वतःचा मळ कपड्यात घालतो. मग साबणाचा मळ कोण काढेल? त्यावर लोक काय म्हणतात? 'अरे, साबण घातला पण टिनोपॉल का घातले नाही?' 'पण टिनोपॉल कशाला घालू? साबणाने मळ तर गेला ना!' आता हे जे टिनोपॉल पावडर असते ना आपल्याजवळ, त्याला आपले लोक काय समजतात? त्यांना असे वाटत असेल की हे कपडे पांढरे करण्याचे औषध असावे! पण नाही, ते तर साबणाचा मळ काढते पण आता या टिनोपॉलने स्वतःचा मळ घातला. त्यासाठी तू दुसरे औषध शोधून काढ की ज्यामुळे टिनोपॉलचा मळ निघेल. या दुनियेत प्रत्येक जण आपापला मळ सोडत जातो. असे कुठपर्यंत चालू राहते? जोपर्यंत शुद्ध स्फटिक औषध सापडत नाही, तोपर्यंत!
तुम्ही गुरू केले नाही आणि येथे आलात म्हणून हा फायदा झाला. जर गुरू केले असते, तर त्यांनी त्यांचा मळ चढवला असता. असा कोण असेल की जो मळ सोडत नाही? तर ज्ञानीपुरुष! ते स्वतः मलीन नसतात, शुद्ध स्वरूपच असतात आणि समोरच्याला शुद्धच बनवितात. दुसरी झंझटच नाही. ज्ञानी पुरुष नवा मळ चढवत नाहीत. अर्थात ज्ञानी पुरुषाजवळ संपूर्ण शुद्धीचा मार्ग आहे, म्हणून शेवटी ज्ञानी पुरुष भेटले, तर सर्व मळ स्वच्छ होतो!
कमतरता चारित्र्यबळाची, शिष्यांमध्ये क्रमिक मार्गात गुरू माथी असतात आणि त्यांच्याबरोबर फक्त दोन