________________
गुरु-शिष्य
मुळीच करू नका'. येथे तर तुमचे कोणी नातेवाईकही नाहीत, तुम्ही एकटेच आहात, तरीही या शिष्यावर का चिडत राहता? त्याने तुमच्या पोटी जन्म तर घेतलेला नाही, मग तुम्हा दोघांमध्ये कषाय होण्याचे कारणच काय? कषाय तर या व्यवहारी लोकांना होतात. पण हा बिचारा तर बाहेरून येऊन शिष्य झाला आहे, त्याच्यावरही तुम्ही कषाय करत राहता?
एखादे पुस्तक जरी इकडे-तिकडे झाले तर गुरू काय म्हणतात? कितीतरी गोष्टी सुनावतात, की, 'तुला अक्कल नाही, तुला भानच नाही.' त्यावर शिष्य काय म्हणतो? 'पुस्तक काय मी खाऊन टाकले? येथेच कुठेतरी पडले असेल, तुमच्या झोळीत नसेल तर खाटेच्या खाली असेल.' पण शिष्य 'खाऊन टाकले? असे बोलतो! अरे, यापेक्षा तर घरातील झंझट बरी. यापेक्षा बायकोचेच शिष्य व्हावे, ती ओरडेल पण मग भजी खायलाही देते ना! काही स्वातंत्र्य तर हवे ना? म्हणजे असे गुरू भेटतात, इतकी सेवा करतो तरी सुद्धा वेड्यासारखे बोलतात, मग काय होणार?
प्रश्नकर्ता : बायको स्वार्थासाठी रागावते आणि ते गुरू निस्वार्थपणे रागावतात, या दोघात फरक नाही का?
दादाश्री : गुरूचे निस्वार्थ वागणे नसते. जगात निस्वार्थ मनुष्य कोणी नसतोच. ते निस्वार्थी दिसतात खरे पण जिकडून-तिकडून स्वार्थ करून, स्वार्थाच्याच तयारीत असतात. ते सगळे स्वार्थी आहेत, दिखावाच आहे हा सर्व. हे तर ज्याच्या लक्षात येईल तोच ओळखू शकेल.
बाकी, गुरू आणि शिष्य दोघेही भांडतच राहतात दिवसभर. दोघांचे पटतच नाही. आपण गुरूंना भेटायला जाऊ आणि विचारु की, 'हे सर्व काय आहे ?' तर ते म्हणतील की, 'तो चांगला नाही, फार वाईट शिष्य भेटला आहे !' आपण ही गोष्ट शिष्याला सांगायची नाही आणि नंतर त्या शिष्याला विचारावे की, 'काय भाऊ, हे सर्व काय होते?' तर तो म्हणेल, 'हे गुरूच बेकार आहेत, इतके वाईट गुरू भेटलेत'! मग यात कोणाची गोष्ट खरी? यात त्यांचा दोष नाही. कारण काळच तसा आला आहे. या काळामुळेच असे सर्व घडत असते. पण मग असा काळ येतो तेव्हाच तर ज्ञानीपुरुष प्रकटतात!